Premium|Terrace Garden : टेरेसवर नक्की लावा या औषधी वनस्पती; आरोग्य राहील उत्तम

Terrace Garden : टेरेस गार्डनमध्ये तुळस, पुदिना यांसारख्या औषधी वनस्पती लावण्याचे आरोग्यदायी फायदे, त्यांची लागवड, देखभाल आणि दैनंदिन आहारातील उपयोग जाणून घ्या.
Terrace Garden

Terrace Garden

esakal

Updated on

डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी

टेरेसवर असायलाच हवी, अशी एक औषधी वनस्पती म्हणजे पुदिना. पाचक आणि वातशामक गुणांसाठी पुदिना ही वनस्पती ओळखली जाते. पोटातील गॅस कमी करणे आणि शरीराला थंडावा देणे या गुणधर्मांमुळे पुदिना नेहमी वापरला जातो.

आजीबाईच्या बटव्यातील बरीचशी औषधी झाडे गच्चीवर लावणे फारसे अवघड नाही. गच्चीवरच या झाडेअसतील, तर आरोग्याच्या छोट्या-छोट्या तक्रारींसाठी याचा वापर होऊ शकतो. किंबहुना, मुळात तब्येत बिघडूच नये, म्हणून आहारात या वनस्पतींचा नित्य वापर ठेवणे शक्य होते.

तुळस

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, सर्दी व खोकल्यापासून आराम देण्यासाठी तसेच शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी तुळस मदत करते. तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. तुळशीच्या पानांचा उपयोग हृदयरोग, मधुमेह व हृदयाचे आजार रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. पचन सुधारणे, तणाव कमी करणे व तोंडाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीदेखील तुळशीचा उपयोग होतो. शिवाय, तुळशीमध्ये कीटक व डास दूर ठेवण्याचे गुणधर्म असतात.

मध्यम आकाराच्या एका कुंडीत तुळशीची दोन रोपे लावावीत. तुळशीच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही. एकदा रोप चांगले वाढू लागले, की बिया पडून नवीन रोपे येत राहतात. मंजिऱ्या खुडल्या, तर आणखीन फुटवे येऊन तुळशीचा भरगच्च डेरा होतो. तुळशीचे कृष्ण तुळस, राम तुळस, कापूर तुळस असे भारतीय प्रकार आहेत आणि स्वीट बेसिल, थाई बेसिल, लेमन बेसिल असे इतर अनेक प्रकार आहेत.

कढीपत्ता

रोजच्या फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कढीपत्त्यात गुणकारी औषधी गुणधर्म असतात. सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, मधुमेह नियंत्रणात राहतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कढीपत्त्याची पेस्ट नारळाच्या तेलात उकळून लावल्यास केस गळणे थांबते आणि केसांची वाढ चांगली होते. या पानांमध्ये भरपूर व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला जरा मोठ्या आकाराच्या कुंडीत याचे रोप लावावे. चांगले लागू झाले, की बेतानेच पाणी द्यावे. मग वर्षभर वाढल्यानंतर त्याची छाटणी करता येते. लागतील तशी एक-एक पाने काढण्याऐवजी देठासह पाने काढावीत. फक्त पाने खेचून काढल्यास उघडे राहिलेले देठ वाळू लागतात. दर महिन्याला जुने आंबट दही पाण्यात व्यवस्थित मिसळून कुंडीत घालावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com