

Social Media Misinformation In India
esakal
मोबाईल फोनच्या छोट्या पडद्यावर (स्क्रीन) काय पाहावे आणि काय पाहू नये याबद्दलच्या चर्चा आणि त्यासंबंधीचे संकेत याबद्दल आता इतके बोलून आणि लिहून झालेय, की त्याविषयी कुणी काही सांगायला गेल्यास त्याला गृहीत न धरण्याचीच बाब सर्वमान्य झाली आहे. प्रत्येकजण याबाबतीत आपल्याला हवे तसे वागत असतो. लहान मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा, हे सगळेच सांगतात, मात्र आपला वेळ जाऊ नये म्हणून आई-वडीलच आपला मोबाईल अनेकदा मुलांच्या हातात देऊन गोंधळ निर्माण करतात. आता ही मोठी माणसेच समाज माध्यमांच्या बाबतीत लहान मुलांसारखी वागत आहेत. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त होणे हाच आता अभिव्यक्तीचा मार्ग असल्याची अनेकांची समजून आहे.