Premium|Digital Fence and Relationships : तंत्रज्ञानाच्या 'महाजालात' अडकलेला मानवी जीव; घराघरांत निर्माण झालेली ही 'चिरशांतता' नेमकी काय सुचवतेय?

Virtual World vs Reality : मोबाईलच्या महाजालात अडकलेली मानवी नाती आता केवळ 'व्हर्च्युअल' संवाद आणि 'डिजिटल' भिंतींपुरती मर्यादित उरली आहेत. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे कौटुंबिक जिव्हाळा हरवत असून, संवादाचा अभाव पिढ्यांमधील अंतर भयाणपणे वाढवत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
Digital Fence and Relationships

Digital Fence and Relationships

esakal

Updated on

डॉ. हेमंत बा. अय्या

लेक कधीच ढुंकूनही पाहत नाही घरच्यांकडे हातातील खेळण्यातून बाहेर येऊन. तिच्या आईलाही कधी नाही वाटत तिच्या खेळण्यात पाहावे डोकावून. माझ्या हातातल्या खेळण्यातच लेकीचा एक संदेश - ‘डॅडा, वॉन्टेड थाउजण्ड बक्स!’ मी विचारू शकतो तिला ‘का गं?’ पण नाही विचारत! कुंपणातील मला छोटीशी वाटणारी भिंत मोठी होण्याच्या भीतीने! तसं मलाही हवंच असतं लेकीकडून खेळण्यातनंच आलेलं ‘थॅंक्यू!’ मला अजूनही भिंतीपल्याड जाता येतं असा दिलासा देत जातं हे ‘थॅंक्यू’... मला आणि माझ्यासारख्या कुंपणातील अब्जादी बापांना... चलन महाजालात अडकल्यापासून!

कधीतरी रचलं गेलेलं हे ब्रह्मांडाजोगं वाढत जाणारं दूरदूरपर्यंतचं कुंपण... त्यात एक लहान भिंत, लेकीत नि माझ्यात! आणि आत्ताच नवे दगड लागू लागलेत या नव्या भिंतीला, माझ्या नि पोरामधल्या. सहचारिणी आणि माझ्यातली भिंत तर आता बाहेरच्या कुंपणाएवढीच दूर म्हणावी! कुंपण खूप खूप दूर... किती दूर? माहीत नाही! ओलांडणार म्हणता कुंपण? शक्य नाही! काटेरी विचारताय का कुंपण? अंहं! कुंपणात दिसणारे काटे नाहीतच मुळी! औषध नसलेल्या भयाण विषाचं; सर्वांनाच हवं हवं असलेलं बीज. अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त. खरंच ते विष का हो? मग हातातलं मोबाईलनामक खेळणं वरदान की शाप? विचारतातच का? आजकाल खेळणीच देतात दाखले... जन्माचे... वाहनावर पळण्याचे... लाल वस्त्यांत कुणाही सोबत झोपून खेळण्यातील चित्रांसमोर नग्न नग्न लोळण्याचे! निळ्या दातांना परवानगी देऊन रात्र पहाटेपर्यंत जागायचे! अन् दाखले शेवटी मरणाचेही... याला काय म्हणावे? कुंपण ओलांडता येत नाही सहज.

Digital Fence and Relationships
Premium|Saree Shopping : बायकोसाठी साडी निवडताना नवऱ्याची ‘फ्री’मधली खरी कसोटी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com