Diamond processing
Esakal
कौस्तुभ केळकर
खाणीतून निघणाऱ्या एका कच्च्या दगडापासून ते त्याला आकर्षक दागिन्याचे किंवा औद्योगिक उपकरणाचे रूप देण्यापर्यंत अनेक हात आणि कौशल्ये कार्यरत असतात. जागतिक बाजारातील हिऱ्यांचा व्यापार, त्यांची मागणी आणि त्यांचे विविध उपयोग हिऱ्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढवत आहेत.
हिरा म्हणजे केवळ एक मौल्यवान रत्न नव्हे, तर तो मानवी इतिहासाचा, भूगर्भशास्त्राचा आणि उद्योगाच्या प्रगतीचा एक तेजस्वी आध्याय आहे. कोट्यवधी वर्षांच्या भूगर्भीय प्रक्रियेतून तयार झालेल्या या कार्बनच्या अणूंनी जगभरातील अर्थव्यवस्था, संस्कृती आणि कला यांना आकार दिला आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना केवळ खाणीतून बाहेर काढणे पुरेसे नसते, तर त्यांना पैलू पाडून, पॉलिश करून आणि विविध रूपांत वापरून त्यांचे खरे सौंदर्य आणि उपयुक्तता सिद्ध केली जाते. हा प्रवास खाणीपासून सुरू होऊन जागतिक बाजारपेठांतील ग्राहक तसेच उद्योगांपर्यंत पोहोचतो.