Premium|MiG-21: मिग २१; भारतीय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची गाथा

Defense project: नाशिकच्या ओझरमध्ये मिग २१चे उत्पादन; आत्मनिर्भरतेचा पाया
mig 21

mig 21

Esakal

Updated on

भावेश ब्राह्मणकर

भारताच्या सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात इतिहास घडविणारी मिग २१ ही भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील लढाऊ विमाने सेवानिवृत्त होत आहेत. या विमानांचे संपूर्ण उत्पादन नाशिकच्या ओझरमध्ये झाले. ते कसे सुरू झाले? त्यापूर्वी कुठल्या नाट्यमय घडामोडी घडल्या? या विमानांमुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची पायाभरणी कशी झाली? याचा धांडोळा...

ही  घटना आहे १९६२ची. चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षणमंत्री पदासाठी यशवंतराव चव्हाण यांना पाचारण केले. चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत चव्हाण यांनी संरक्षणमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, केंद्रात मंत्री झाल्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या आत खासदार होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन नाशिककरांनी चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com