Premium|India national security challenges : पाकिस्तानचे वाढते भूराजकीय महत्त्व, पश्चिम आशियातील अस्थिरता आणि भारतावरील दहशतवादी धोके

India Foreign Policy 2026 : पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हाने अधिक जटिल झाली आहेत. पाकिस्तानचे वाढते सामरिक महत्त्व आणि अमेरिकेचे बदललेले परराष्ट्र धोरण या पार्श्वभूमीवर भारताला नव्या व्यूहरचनेची गरज आहे.
India national security challenges

India national security challenges

esakal

Updated on

गेल्या काही वर्षांत भारतीय परराष्ट्र धोरण आणि अंतर्गत सुरक्षेसमोर विविध प्रकाराची आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांचा यशस्वी प्रतिकार करण्याची क्षमता भारतीय व्यवस्थेमध्ये नक्कीच आहे. भारतातील नागरी लोकसंख्या अधिकाधिक प्रमाणात या नव्या स्वरूपाच्या आव्हानांनी प्रभावित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारताने नुकतेच राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जाहीर केले आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. परंतु, भारताचे दहशतवादविरोधी धोरण आता नागरिकांनाही प्रशिक्षित केल्याशिवाय पूर्ण होणार नाही.

भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात जागतिक भूराजकीय परिस्थिती निव्वळ बदललीच आहे असे नव्हे; तर ती आणखी अस्थिर झाली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हाने या कालावधीत अधिक जटिल आणि गंभीर झाली आहेत. त्यामुळे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षेस निरंतर प्रभावित करणाऱ्या आव्हानांचे विश्लेषण होणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com