Premium|Rockfort Temple Trichy : तिरुचिरापल्लीच्या ललितांकुर पल्लवेश्वर गृहम्; शिव-गंगाधराच्या शिल्पकलेचा अद्वितीय नमुना

Pallava Dynasty Architecture : तिरुचिरापल्लीच्या प्रसिद्ध खडकाळ टेकडीवर पल्लव राजा महेंद्रवर्मनने कोरलेले 'शिव-गंगाधर' शिल्प हे देव आणि राजा यांच्यातील अद्वैत दर्शवणारा शिल्पकलेचा एक अजोड नमुना आहे.
Rockfort Temple Trichy

Rockfort Temple Trichy

esakal

Updated on

गुहेत समोर दिसणारा गंगाधर हा अतुलनीय शिल्पकौशल्याचा नमुना. तो नुसताच शिवाचा अवतार वाटत नाही, तो जणू महेंद्रवर्मनचं रूपही धारण करतो. शिव गंगेला धारण करतो आणि राजा कावेरीला. म्हणून या प्रतिमेत देव आणि राजा दोघांचीच छाया मिसळल्याची भावना सहज मनात येते. या शिल्पासमोर उभं राहिलं की जाणवतं, देवाची दिव्यता आणि राजाची महती एका दगडात विलीन झाली आहे.

तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली हे शहर इतकं प्राचीन आणि भव्य आहे, की त्याची ओळख करून देण्याची गरजच पडत नाही. हे शहर जणू दक्षिण भारताच्या हृदयात उभं राहिलेलं एक जिवंत स्मारक आहे. इथं डोंगराच्या कड्यावरून उमटणाऱ्या लाटांसारखी इतिहासाची धारा वाहते. या शहराची कहाणी सांगताना मन कधी कधी त्या प्राचीन काळात हरवतं, जिथं देवता आणि मानवी श्रद्धा एकत्र गुंफल्या गेल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com