तिचं काहीतरी बरंवाईट झालं असेल, असं म्हणत तिला श्रद्धांजलीही वाहण्यात आली पण उंच शिखर सर करण्याचं स्वप्न तिनं साकार केलं होतं..

८ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपैकी, पाच शिखरे फक्त ३० दिवसांत सर केली
baljit  kaur
baljit kaurEsakal

‘ती’ची गोष्ट: केतकी जोशी

कष्टाची कामं करण्याची तिला सवय होती. पर्वतरांगांत राहिल्याने जिद्दीनं तग धरून राहणंही तिच्या स्वभावातच होतं. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाची होती तिची इच्छाशक्ती.

उंच शिखर सर करण्याचं तिचं स्वप्न तिनं साकार केलं; अगदी जिवावर उदार होऊन म्हणतात तसंच!

पर्वतांवर चढण्याची, उंचच उंच शिखरांवर पोहोचण्याची स्वप्न तिनं शाळेच्या वयातच पाहिलं होतं, आणि मोठ्या कष्टाने तिनं ते पूर्णही केलं, अगदी एका अभूतपूर्व विक्रमासह.

याच विक्रमी मोहिमेतल्या एका घटनेनं तिला गिर्यारोहकांच्या जगातल्या दंतकथांच्या दालनात नेऊन ठेवलं आहे.

ऑक्सिजन सपोर्ट न घेता अन्नपूर्णाशिखर सर केल्यानंतर उतरताना चौथ्या कँपच्या परिसरात तिचा ठावठिकाणा लागेनासा झाला होता.

तिचं काहीतरी बरंवाईट झालं असेल, असं म्हणत तिला श्रद्धांजलीही वाहण्यात आली. पण ज्या जिद्दीनं तिनं माउंट अन्नपूर्णाला गवसणी घातली होती, त्याच जिद्दीने ती परतही आली.

बलजीत कौर! गिर्यारोहण हा हिमाचलातल्या या बलजीतचा छंदच नाही तर तो तिचा श्वास आहे. २८ वर्षांच्या बलजितनं माउंट अन्नपूर्णासह हिमालयातल्या अष्टहजारी शिखरांपैकी, म्हणजे ८ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपैकी, पाच शिखरे फक्त ३० दिवसांत सर केली आहेत.

आणि ही कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय आहे. हिमाचल प्रदेशातील्या सोलन जिल्ह्यातल्या कंडाघाट तालुक्यातल्या एका लहानशा गावातली बलजीत लहानाची मोठी झाली ती हिमालयाच्या रांगांच्या सोबतीनेच.

तीन भावंडांमध्ये बलजीत सगळ्यांत मोठी. महाविद्यालयात असताना एनसीसीच्या एका कँपमध्येतिनं पहिल्यांदा गिर्यारोहण केलं आणि हे काहीतरी खास आहे हे तिला जाणवलं.

वीस वर्षांची असताना एनसीसीच्या माउंट देव तिब्बाच्या मोहिमेसाठी तिची निवड झाली. त्यानंतर गिर्यारोहण सोडायचं नाही हे तिनं पक्कं ठरवलं. २०१५मध्ये माउंट त्रिशूल सर करणाऱ्या एनसीसी गिर्यारोहकांच्या टीममध्येही ती होती.

नेपाळ हिमालयातील ८ हजार मीटर उंचीची पाच शिखरं फक्त ३० दिवसांत सर करण्याची मोहीम प्रचंड आव्हानात्मक होतीच. पण अन्नपूर्णा शिखरावर पोहोचताना ऑक्सिजन सपोर्ट न घेण्याचा तिचा निर्णय जास्त आव्हानात्मक होता.

दोन शेरपांसह तिनं अन्नपूर्णाशिखर सर केलं. कोणत्याही ऑक्सिजन सपोर्टशिवाय अन्नपूर्णाशिखर सर करण्याचा विक्रमही तिच्या नावावर नोंदवला गेला. त्यासाठी ती कित्येक वर्ष मेहनत करत होती.

मात्र अन्नपूर्णाशिखरावरुन खाली उतरत असताना ती बेपत्ता झाली. तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अत्यंत बिकट परिस्थितीत ती सापडली होती. बराच वेळ पत्ता न लागल्यामुळे कदाचित बलजीतचं काही बरंवाईट झाल्याची शंकाही अनेकांना आली.

समुद्रसपाटीपासून ७ हजार ३३५ मीटर उंचीवरच्या त्या जीवघेण्या एकटेपणातही बलजीत प्रयत्न करीत होती तळाशी संपर्क साधण्याचे. अखेरीस तिनं पाठवलेले इमर्जन्सी सिग्नल बचाव पथकाला मिळाले आणि त्यानंतर जीपीएस लोकेशनचा मागोवा काढत त्यांनी बलजीत कौरला शोधून काढलं.

baljit  kaur
Mountain Day : महाराष्ट्रातले 'हे' शिखर ट्रेकींगसाठी उत्तम...

कुठूनही मदत मिळण्याची अपेक्षा नसताना, पुरेसा ऑक्सिजन नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर बलजीतनं मृत्यूला परतवून लावलं. नेपाळचं मनास्लूशिखर बलजीतनं ऑक्सिजन सपोर्टशिवायच सर केलं होतं. त्यामुळे अन्नपूर्णाशिखरही आपण तसंच सर करू शकतो, असा विश्वास तिला वाटत होता.

पण ते बलजीतला वाटलं तितकं सोपं नव्हतं. जगण्याच्या संघर्षासाठीची तिची कहाणी तिच्याच तोंडून ऐकायला हवी. गिर्यारोहण मोहिमेवर नसताना बलजीत गतिमंद मुलांना नृत्य शिकवते, त्यांना फिटनेस आणि योगाचंही प्रशिक्षण देते.

गिर्यारोहण करणं म्हणजे फक्त एखादा पर्वत चढून जाणं इतकंच नसतं. त्यासाठी इतर तयारीही प्रचंड असावी लागते. बलजीत गेली अनेक वर्षे तयारी करत होती. ही आपल्या गिर्यारोहणाची केवळ सुरुवात आहे, असं ती आजही मानते.

शेतीतली कष्टाची कामं करण्याची तिला सवय होती. वयाच्या आठव्या वर्षापासून तिला पूर्ण स्वयंपाक करता येत होता, त्याचा तिला फायदा झाला.

पर्वतरांगांत राहिल्याने जिद्दीनं तग धरून राहणंही तिच्या स्वभावातच होतं. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाची होती तिची इच्छाशक्ती. त्यामुळे गिर्यारोहणाचं स्वप्नं पूर्ण करतानाच तिनं एका विक्रमालाही गवसणी घातली

--------------------

baljit  kaur
Tourism News: उकळत्या पाण्याचे झरे आणि सततच्या वाफा.. हे नितांत सुंदर ठिकाण आहे कुठे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com