Indian Armed Forces
Esakal
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)
चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर, न्यायाचा अन्यायावर विजय म्हणून दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी ‘सीमोल्लंघन’ करण्याची प्रथा आहे. या सणाच्या निमित्तानं भारतीय सशस्त्र दलांच्या गौरवशाली कामगिरीचा, त्यांनी केलेल्या सीमोल्लंघनाविषयीचा सखोल मागोवा...
ता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर आजपर्यंत भारतानं विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली आहे, विविध क्षेत्रांत सीमोल्लंघन केलं आहे. त्यातीलच एक प्रमुख क्षेत्र म्हणजे भारतीय सशस्त्र दल! आपल्या संस्कृतीत शस्त्रांचं महत्त्व फार पूर्वीपासून सांगितलं गेलं आहे. भारतीय परंपरेत धर्मरक्षणासाठी शस्त्र उचलणं पवित्र व योग्य मानलं गेलं आहे. महाभारतात युद्धसमयी श्रीकृष्णानं अर्जुनाला ‘शस्त्र उचल आणि युद्ध कर’ हा आदेश दिला होता. त्यातून शस्त्रांचं महत्त्व अधोरेखित होतं.