Premium|Daily Life Contradictions : विरोधाभासांनी भरलेले आयुष्य आणि नव्याने सुरुवात करण्याची आशा

Funny Human Habits : दैनंदिन जीवनातील विरोधाभास, अपूर्ण संकल्प आणि छोट्या मोहांपुढील हार यांचे हलकेफुलके चित्रण करत हा लेख मानवी स्वभावातील गमतीदार वास्तव आणि आशावादी दृष्टिकोन उलगडतो.
Daily Life Contradictions

Daily Life Contradictions

esakal

Updated on

अमोल कमलाकर कुलकर्णी

मला विरोधाभास सर्वांत प्रिय आहे, कारण तो मला आशा देतो. ‘उद्यापासून नक्की’ ही माझी सगळ्यात आवडती खोटी गोष्ट आहे आणि मी ती रोज स्वतःला सांगतो. हे सगळे विरोधाभास पाहता वाटतं, आयुष्य एखाद्या हास्यनाटकासारखं आहे - जिथं नायक स्वतःच खलनायक होतो आणि प्रेक्षकही तो स्वतःच असतो!

सकाळी सहा वाजता माझा फोन ओरडतो, ‘उठ रे आळशी राजा!’ मी डोळे उघडतो. मनात एकदम धाडसी विचार येतो - आजपासून खरोखर व्यायामाचा प्रवास सुरू! जिमची पिशवी रात्रीच भरलेली असते, पाण्याची बाटली तयार असते, बूटही स्वच्छ केलेले असतात. ‘आज मी नवीन माणूस होणार’ असं स्वतःला हळूच सांगितलं जातं. पण नेमक्या त्याच वेळी खाली रस्त्यावर गरम वडापाववाला येतो. त्याच्या घंटागाडीची घंटा वाजते आणि आवाज येतो, ‘ताजे गरम वडापाव! ताजे वडापाव, सोबत चटणी!’ माझं पोट लगेच जागं होतं आणि म्हणतं, ‘भाऊ, प्राधान्य बदल. जिमबिम नंतर. कॅलरी नंतरही जाळता येतील.’ मी खिडकीतून डोकावतो. दोन वडापाव घेतो, एकात जास्त चटणी. जिमची पिशवी? ती तशीच पडून राहते. मी स्वतःलाच हसतो. आयुष्य असंच असतं ना? मन कोरेगाव पार्कच्या जिमकडे धावतं, पोट कॅम्पच्या गरम वडापावकडे. आणि यात नेहमी पोटच जिंकतं बरं! हा पहिला विरोधाभास. हा खेळ सुरू राहतो.

Daily Life Contradictions
Premium|Social Media: सोशल मीडियाच्या व्यसनाधीन अल्गोरिदमविरुद्ध कॅलिफोर्नियातील खटला, मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com