Rumination syndrome : रुमिनेशन सिंड्रोम

रुमिनेशन सिंड्रोम हा आजार दुर्मीळ समजला जात असला, तरी या आजाराने त्रस्त असलेल्या प्रौढ आणि लहान मुलांचे निदान आता जास्त प्रमाणात होऊ लागले आहे
Rumination syndrome
Rumination syndromeesakal
Updated on

डॉ. अविनाश भोंडवे

रुमिनेशन सिंड्रोम हा आजार दुर्मीळ समजला जात असला, तरी या आजाराने त्रस्त असलेल्या प्रौढ आणि लहान मुलांचे निदान आता जास्त प्रमाणात होऊ लागले आहे. याचे कारण रुमिनेशन सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली हे नसून, या आजाराचे निदान करण्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची जाणीव आणि क्षमता अधिक वाढल्यामुळे या रुग्णांची संख्या अधिक आढळू लागली आहे. काही लहान बाळांमध्येदेखील हा आजार शोधला गेल्याचे वैद्यकीय अहवालांमध्ये नमूद केलेले आहे.

“माझ्या मुलाला खाल्लं की उलटी होते. तो जेवतो आणि पाच-दहा मिनिटांनी सगळं भडाभडा ओकून टाकतो,” अशी तक्रार घेऊन अधूनमधून काही पालक येतात. मुलाला पाहिले, तर तशी त्याची तब्येत फार खराब झालेली नसते, वजन मात्र काहीसे कमी झाल्यासारखे दिसते. असा त्रास असलेल्या मुलाला त्याचे आईवडील आधी समजावतात, रागावतात आणि मग धपाटेही घालतात. पण या साम-दंड नीतीचा काहीही उपयोग होत नाही आणि खाऊन उलटी करण्याच्या त्या मुलाच्या ‘सवयीत’ काहीच बदल होत नाही.

या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘रुमिनेशन सिंड्रोम’ म्हणतात. हा एक दुर्मीळ वर्तन विकार (बिहेविअरल प्रॉब्लेम) असतो. बहुधा तो मुलांमध्ये आणि क्वचित प्रसंगी काही प्रौढांमध्येही आढळतो.रुमिनेशन सिंड्रोममध्ये नुकतेच खाल्लेले अन्न आपोआप उलटून पडते. ज्या मुलांना हा त्रास असतो, ती इतरांसारखेच व्यवस्थित जेवतात खरी; पण साधारणपणे दहा मिनिटे ते अर्धा तास या कालावधीत सारे न पचलेले अन्न, आपोआप पोटातून अन्ननलिकेत आणि अन्ननलिकेतून त्यांच्या तोंडात येते. अशावेळी ही मुले पालकांच्या भीतीने, ते अन्न एकतर पुन्हा चघळतात, गिळतात किंवा थुंकून टाकतात.

Rumination syndrome
Sakal Impact : शहाद्यातील रस्त्याची अखेर दुरुस्ती; मुख्य रस्त्याच्या वृत्ताची दखल

हा प्रकार रोजच्या रोज प्रत्येक जेवणानंतर घडतो. रुमिनेशन ही एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया असते, ती पूर्ण अनैच्छिक असते आणि जाणीवपूर्वक मुळीसुद्धा केलेली नसते. रुमिनेशन सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार आहे, पण फार कमी वेळा त्याचे योग्य निदान होते. बहुतेक वेळा हा त्रास काही दुसऱ्याच आजाराचे लक्षण मानले जाते आणि मग भलत्याच तपासण्या आणि त्यावर वेगळेच उपचार केले जातात.

हा आजार दुर्मीळ समजला जात असला, तरी या आजाराने त्रस्त असलेल्या प्रौढ आणि लहान मुलांचे निदान आता जास्त प्रमाणात होऊ लागले आहे. याचे कारण रुमिनेशन सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली हे नसून, या आजाराचे निदान करण्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची जाणीव आणि क्षमता अधिक वाढल्यामुळे या रुग्णांची संख्या अधिक आढळू लागली आहे. काही लहान बाळांमध्येदेखील हा आजार शोधला गेल्याचे वैद्यकीय अहवालांमध्ये नमूद केलेले आहे.

कारणमीमांसा

तज्ज्ञांच्या मते रुमिनेशनच्या रुग्णांमध्ये जे घडते, ते त्यांच्या नकळत घडते. छाती आणि पोट यांना विभागणारे श्वासपटल (डायफ्रॅम) हा अनैच्छिक प्रकारचा स्नायू असतो. तो या व्यक्तींमध्ये जेवणानंतर नकळतपणे शिथिल केला जातो.

हे असेच नकळतपणे पुन्हापुन्हा होत राहते. परिणामतः जेवल्यावर अजाणतेपणे श्वासपटल सैलावण्याची एक सवयच त्यांच्या शरीराला लागून जाते. काही लोकांना जशी जेवल्यानंतर ढेकर देण्याची सवय (बेल्चिंग रिफ्लेक्स) असते, तशातलाच हा प्रकार असतो. परंतु ढेकर देताना त्या लोकांच्या पोटातला गॅस आवाज करत बाहेर पडतो, रुमिनेशन सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये गॅसऐवजी पोटातले अन्नच बाहेर पडते.

Rumination syndrome
Sakal Podcast : पॅसिफिक महासागरात उडत्या तबकडीचे अवशेष ते अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप

लक्षणे

खाल्लेले अन्न लगेच उलटणे ः गॅस्ट्रायटिस, पोटाचा अल्सर अशा जठराच्या आजारांत, किंवा पचनसंस्थेच्या जंतूसंसर्गात खाल्लेले अन्न फेकल्यासारखे बाहेर पडते. पण ते अर्धवट पचलेले असते, पोटातील जठराम्ल त्यात मिसळलेले असते.

त्यामुळे उलटीची चव आंबट लागते. मात्र रुमिनेशनच्या रुग्णांत बर्‍याचदा उलटलेले अन्न, जसेच्या तसे न पचलेले असते आणि त्याची चवही थेट प्रथम खाल्लेल्या अन्नासारखीच असते. विशेष म्हणजे या व्यक्तींना आपल्याला उलटी होणार आहे किंवा होतेय अशी भावनासुद्धा बऱ्याचदा होत नाही.

रुमिनेशन सिंड्रोमच्या इतर लक्षणांतखाल्ल्यानंतर पोटात दुखणे, पण अन्न उलटून पडल्यावर आराम पडणे.जेवल्यावर पोटात गुबारा भरल्यासारखे वाटणे, श्वासाला दुर्गंधी येणे,काही वेळेस, खाल्ल्यावर काही मिनिटे मळमळणे,नकळत वजन कमी होणे,या लक्षणांचादेखील समावेश होतो.

Rumination syndrome
Sakal Podcast : मोदी पवार एका मंचावर येणार का? ते हिमाचलमध्ये पावसाचा हाहा:कार

निदान

अन्नपदार्थ खाल्ल्यावर किंवा जेवणानंतर उलटी होणे हा कॉमन त्रास असल्याने अनेकदा रुमिनेशन सिंड्रोमचे, उलट्यांच्या अन्य आजाराच्या दृष्टीने चुकीचे निदान केले जाते. या इतर आजारांमध्ये-

गॅस्ट्रोपॅरेसिस : यामध्ये पचन संस्थेत कोणताही अडथळा झालेला नसतो, पण जठराचे स्नायू अन्न घुसळण्यातआणि ते पुढे लहान आतड्याकडे सरकवण्यात कमकुवत असतात. त्यामुळे पोटातील सर्व अन्न उलटून पडते.

यात मळमळ आणि उलट्या ही सर्वसामान्य लक्षणे नेहमीच असतात. शिवाय जेवणापूर्वी खूप भूक लागणे, पोट गच्च होणे, पोट दुखणे अशीही लक्षणे दिसतात. पोटाच्या क्लिनिकल तपासणीत, छातीलगतचा पोटाच्या भाग (एपिगॅस्ट्रिक रिजन) थोडा फुगल्यासारखा दिसतो आणि तिथे हात लावल्यास दुखते.

जीईआरडी- (गॅस्ट्रो-ईसोफेजल रिफ्लेक्स डिसीज): पचनसंस्थेचा हा एक दीर्घकाळ चालणारा आजार असतो. यात पोटातील खाल्लेले अन्न व इतर द्रव पदार्थ अन्ननलिकेत जातात आणि उलटी होते. जीईआरडीचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत जळजळ होणे.

ही जळजळ छातीच्या मध्यभागी असलेल्या खंजिरी हाडाच्या (स्टर्नम) मागे सुरू होऊन मान आणि घशापर्यंत जाते, छातीत दुखते, अन्न गिळायला त्रास होतो (डिसफेजिया), सतत कोरडा खोकला येतो, घसा खवखवतो, आवाज बसतो, उलटलेले अन्न आंबट लागते, आणि घशात आवंढे येतात

क्रॉनिक गॅस्ट्रायटिस : जठराला सूज येते आणि ती दीर्घकाळ राहते. त्यामुळे आंबट ढेकर, छातीत जळजळ, पोटात दुखणे आणि उलट्या येत राहतात.रुग्णाच्या त्रासाची लक्षणे, त्याच्या आजाराचा इतिहास आणि रुग्णाला विचारले जाणारे प्रश्न यातून रुमिनेशन सिंड्रोम आजाराचे प्राथमिक निदान होते. या प्रश्नांमध्ये -जेव्हा अन्न येते तेव्हा त्याची चव कशी असते? चव खाण्याआधी होती तशीच असेल तर याचा अर्थ अन्न पचले नाही.

म्हणजेच रुमिनेशन सिंड्रोमची शक्यता आहे.इतर आजारांमध्ये, उलट्या केलेले अन्न आणि सामान्यतः तोंडात धरताच येत नाही. इतर तपासण्यांमध्ये, गॅस्ट्रोस्कोपी, पोटाची सोनोग्राफी, पोटाचा सिटीस्कॅन किंवा एमआरआय, यकृताच्या कार्याच्या तपासण्या, मूत्रपिंडाच्या कार्याच्या तपासण्या, जंतुसंसर्गासाठी रक्ताची तपासणी, पचनसंस्थेच्या जंतूसंसर्गासाठी शौच तपासणी वगैरे तपासण्या केल्या जातात.

Rumination syndrome
Sambhaji Nagar Crime : पोलिसांनी जप्त केली धारदार तलवार

उपचार उलटी, मळमळ, आम्लता या त्रासांच्या नेहमीच्या उपचाराने रुमिनेशन सिंड्रोमची लक्षणे बरी होत नाहीत. रुमिनेशन सिंड्रोमसाठी विशिष्ट उपचार करताना खालील घटक विचारात घेतले जातात- रुग्णाचे वय एकूण आरोग्य आणि पूर्वीच्या आजारांचा इतिहाससतत अन्न उलटून पडल्याचे प्रकार केव्हापासून होत आहेत, त्याने रुग्णाच्या एकंदरीत आरोग्यावर आणि शरीरावर कितपत परिणाम झाला आहे.विशिष्ट औषधे, उपचारांसाठीच्या प्रोसिजर किंवा उपचारांची थेरपी रुग्ण चांगल्या प्रकारे हाताळू शकतो

रुग्णाची ही स्थिती किती काळ टिकणे अपेक्षित आहे डॉक्टरांचे क्लिनिकल मत रुमिनेशन सिंड्रोमवर प्रभावीपणे उपचार करणारी कोणतीही औषधे उपलब्ध नाहीत. हे थांबवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अन्न कसे खावे आणि पचवावे याचे योग्य प्रशिक्षण रुग्णाला देणे. यासोबत डायाफ्रामॅटिक श्वास कशा घ्यायचा?

याचेही प्रशिक्षण देणे आवश्यक असते. वर्तणूक मानसशास्त्रतज्ज्ञ डायाफ्रॅमॅटिक श्वास घेण्याचे तंत्र शिकवतात. जेवणाच्या सुरुवातीला हे तंत्र वापरावे लागते. कालांतराने, बहुतेक लोक श्वासोच्छ्वासाच्या तंत्रावर प्रभुत्व मिळवू शकतात आणि रुमिनेशन सिंड्रोमच्या लक्षणावर नियंत्रण आणू शकतात.

प्रतिबंध रुमिनेशन सिंड्रोम का सुरू होतो, याचे पूर्ण ज्ञान वैद्यकीय शास्त्राला अजूनही नाही. यामध्ये मेंदूचा काही दोष असतो का? चयापचय क्रियांमध्ये किंवा शरीरातील इतर संस्थांमध्ये काही समस्या असते का? यावर संशोधन सुरू आहे.

त्यामुळे या आजाराचा प्रतिबंध नक्की कसा करता येतील याबाबत स्पष्टता नाही. रुमिनेशन सिंड्रोमसह जगणे रुमिनेशन सिंड्रोममुळे फारसे शारीरिक नुकसान होत नाही. क्वचित प्रसंगी, उलटलेल्या अन्नातील गॅस्ट्रिक अॅसिड अन्ननलिकेमध्ये गेल्याने काही त्रास नक्कीच होऊ शकतात.

किशोरवयीन आणि प्रौढांमध्येयामुळे वजन कमी होते. मात्र सामाजिक संबंधात या आजाराचा परिणाम होऊ शकतो. लग्न समारंभात किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमात, व्यावसायिक संस्थांच्याभोजन समारंभात,

खाल्ल्यानंतर या व्यक्तींना उलटी होणे हा चर्चेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न बनू शकतो. त्याकरिता अशी लक्षणे दिसल्यास, कोणताही संकोच किंवा भीड न बाळगता, प्रथम वैद्यकीय तज्ज्ञांना आणि नंतर मानसरोग तज्ज्ञांना तसेच समुपदेशकांना दाखवून सल्ला आणि उपचार करणे जरूरीचे असते. खाल्ल्यानंतर पोट फुगणे, उलट्या होणे, आणि वजन कमी होत जाणे अशी लक्षणे असलेल्या प्रत्येकामध्ये रुमिनेशन सिंड्रोमचा विचार केला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.