साठीत होणारे विकार तिशी चाळीशीत होण्याचे कारण काय? जीवनशैलीचे विकार का होतात? जाणून घ्या डॉक्टरांकडूनच

भारतामध्ये जीवनशैलीचे हे आजार मृत्यूचे प्रथम क्रमांकाचं कारण झाले आहेत. याबाबतीत त्यांनी संसर्गजन्य आजारांनाही मागे टाकले आहे
lifestyle problem
lifestyle problemEsakal

डॉ ऋतुपर्ण शिंदे, एमडी, डीएनबी, एफएसीसी

किरण, ३४ वर्षांचा मध्यमवयीन आयटी प्रोफेशनल. एकदा कधीतरी छातीत दुखतंय म्हणून कार्डिओलॉजिस्टकडे गेला. तपासण्यांचा भाग म्हणून ईसीजी, 2डी इको आणि स्ट्रेस टेस्ट झाल्या. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे, असे दिसून आल्यावर किरणला कोरोनरी अँजिओग्राफीचा सल्ला दिला गेला. यापूर्वी किरणला काहीही त्रास झालेला नव्हता.

रिस्क फॅक्टर म्हणाल तर कामाच्या अनियमित वेळा, कधीतरी धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव हे रिस्क फॅक्टर आहेत. किरणचे वडील सत्तरीत असताना त्यांची बायपास झालेली आहे. आता त्याने काय करावे, हा प्रश्न त्याला पडलेला आहे.

आता त्याला विविध सल्ले मिळायला लागले आहेत. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, आयुर्वेद, गूगल डॉक्टर आणि विविध अशास्त्रीय उपचार या सर्वांमधून कोणाची निवड करायची हा प्रश्न किरणसमोर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com