आहारात मांस, फळे, भाज्या, नट्स आणि बियांवर भर देणाऱ्या 'पॅलिओ डाएट'बाबत विज्ञान काय म्हणते?

पॅलिओ डाएट म्हणूनही ओळखली जाणारी पॅलिओलिथिक नावाची एक आहार पद्धती थोड्याच कालावधीत कमालीची लोकप्रिय झाली खरी, पण त्याबाबत तज्ज्ञांमध्ये खूपच उलटसुलट मते आहेत
Paleo Diet
Paleo Diet Esakal

डॉ. अविनाश भोंडवे

गेल्या काही वर्षांत आरोग्य सुधारण्यासाठी विविध प्रकारच्या आहारपद्धती उदयाला आल्या. यातल्या प्रत्येक पद्धतीचे अनुसरण करणारे लोकही लाखांच्या संख्येत आहेत.

त्यातील पॅलिओ डाएट म्हणूनही ओळखली जाणारी पॅलिओलिथिक नावाची एक आहार पद्धती थोड्याच कालावधीत कमालीची लोकप्रिय झाली खरी, पण त्याबाबत तज्ज्ञांमध्ये खूपच उलटसुलट मते आहेत.

काहींच्या मते तो अतिशय आरोग्यदायी आणि उत्तम आहार आहे, तर काही तज्ज्ञांना तो हानिकारक वाटतो.

साहजिकच या पॅलिओ डाएटच्या संभाव्य आरोग्यविषयक फायद्यांबाबतची तथ्ये, त्यामागील संशोधनातील मुद्दे आणि या डाएटचे पालन केल्यास निर्माण होऊ शकणाऱ्या जोखमांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com