Premium|Sapphire: सॅफायर नावाच्या हिऱ्यावर गाणं..!

cultural diversity: प्रसंगी एकमेकात सामावून जात, इतरवेळी आपलं अस्तित्त्व अभिमानानं जपलेली सॅफायरची झळाळी
Sapphire

Sapphire

Esakal

Updated on

अदिती मराठे

Exploring India's cultural and geographical diversity through its colors : इंद्रधनुष्याचे सात रंग एक केले, तर शुभ्र पांढरा रंग तयार होतो. भारतासारख्या असंख्य रंग ल्यालेल्या भूमीसाठी याहून वेगळं रूपक असू शकत नाही. प्रसंगी एकमेकांत सामावून जात, इतरवेळी आपलं अस्तित्त्व अभिमानानं जपत, कधी इतिहासाची साक्ष देत, कधी भविष्याचा वेध घेत आसेतुहिमाचल लखलखणाऱ्या या सॅफायरची झळाळी अधिकाधिक वृद्धिंगत होत राहो!

काही महिन्यांपूर्वी एड शिरन या ब्रिटिश कलाकारानं प्ले नावाचा अल्बम प्रसिद्ध केला. त्या अल्बममध्ये सॅफायर नावाच्या हिऱ्यावर गाणं आहे. एडनं आपल्या भारतभेटीमध्ये हे गाणं तयार करताना हिमालयाच्या शुभ्र शिखरांपासून केरळच्या सुखद हिरव्या गारव्यापर्यंत, राजस्थानच्या उत्फुल्ल चुटुक रंगांपासून मेघालयाच्या गंभीर पांढऱ्या-करड्या शांततेपर्यंत सगळे रंग नुसते डोळ्यांनी पाहिले नाहीत, तर सगळ्या रंध्रांतून अनुभवले, आणि या अनुभूतीतून भारताच्या बहुरंगी संस्कृतीबद्दल वाटणारा आदर त्यानं आपल्या गाण्यातून मांडला.

या सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी, की संपूर्ण गाणंभर तो भारताला ‘सॅफायर’ म्हणजेच नीलम म्हणतोय. याचं कारण असं, की नीलम खड्याचा अपवर्तन निर्देशांक म्हणजेच रिफ्रॅक्शन इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे या खड्यातून रिफ्रॅक्ट झालेला प्रकाश विविध रंगांचा स्पेक्ट्रम तयार करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com