
Saudi Pakistan defense agreement
esakal
डॉ. मनीष दाभाडे
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील संरक्षण करारामुळे पश्चिम आणि दक्षिण आशियातील सामरिक समीकरणे बदलणार आहेत. या करारातून सौदी अरेबियाला सुरक्षेची हमी मिळणार आहे, तर पाकिस्तानला आर्थिक आणि राजनैतिक स्तरावर फायदा होणार आहे. हा करार भारतासाठी आव्हानात्मक असून, लवचिक राजनैतिक धोरण अवलंबावे लागणार आहे.
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १७ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक सामरिक परस्पर संरक्षण करार झाला. या करारामुळे पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियातील सत्तासमतोल बदलण्याची शक्यता आहे.