अ‍ॅग्रो टुरिझम : निसर्गाच्या कुशीत राहायचंय का?
अ‍ॅग्रो टुरिझम : निसर्गाच्या कुशीत राहायचंय का?esakal

अ‍ॅग्रो टुरिझम : निसर्गाच्या कुशीत राहायचंय का?

निसर्गांचे वरदान लाभलेल्या मावळ तालुक्यात लोणावळा-खंडाळ्यातील वर्षाविहार पर्यटकांना मोहीत करीत होता.
Summary

पर्यटन म्हटले की, सर्वांनाच हवेहवेसे असते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंदिस्त असलेले पर्यटकांना सध्याच्या काळात जणू सासूरवासिनीला जशी माहेरची ओढ लागते, अगदी तशीच भावना पर्यटकांना लागली आहे.

निसर्गांचे वरदान लाभलेल्या मावळ तालुक्यात लोणावळा-खंडाळ्यातील वर्षाविहार पर्यटकांना मोहीत करीत होता. त्यानंतर ग्रामीण मावळात अ‍ॅग्रो टुरिझम रुजले. त्यालाही पर्यटकांनी डोक्यावर घेतले. मात्र, सध्याच्या काळात निसर्गाच्या सहवासात थेट रमण्यासाठी रुजत असलेली टेंट संस्कृती पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे. धरणाच्या पाण्याच्या सहवासात सुर्योदय आणि सूर्यास्त अनुभवणे, पाण्याच्या कुशीत टेंटमध्ये झोपण्याचा आनंद घेण्याचा आनंद काही औरच.

पर्यटन म्हटले की, सर्वांनाच हवेहवेसे असते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंदिस्त असलेले पर्यटकांना सध्याच्या काळात जणू सासूरवासिनीला जशी माहेरची ओढ लागते, अगदी तशीच भावना पर्यटकांना लागली आहे. पर्यटन सर्वांनाच हवे असते. मग ते अगदी दऱ्या खोऱ्यात असो वा कुल्लू मनाली, दार्जिलिंग. प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे सारे फिरायला जातात. एका हिंदी चित्रपटात पूर्वीपासून लोणावळा-खंडाळा ही ठिकाणे देशभरातील पर्यटकांना आवडतात. आधी थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर, माथेरान, कुल्लू मनाली यासारख्या पर्यटनस्थळ म्हणून उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल-मे महिन्यात लोणावळा-खंडाळ्यात येऊ लागले. पण त्यानंतर या शहराने आपला ट्रेंड बदलला. त्यानंतर हे शहर पावसाळ्यातील पर्यटन म्हणून नावारुपाले आहे. म्हणजे जुलै, आगस्ट या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकाने हा परिसर गजबजून जाऊ लागला. पावसाळी पर्यटन ठिकाण म्हणून ही पर्यटनस्थळे ओळखू लागली. या भागात कमालीची गर्दी होऊ लागली. इतके की कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी शनिवार-रविवारी या ठिकाणी होणारी ओव्हरलोड गर्दी त्रासदायक होऊ लागली. पावसाळी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकाचा निम्मा वेळ हा वाहतूक कोंडीमध्येच जाऊ लागला. मग फिरण्याचा इंटरेस्ट निघून जायचा. त्या पोलिसांनी काही ठिकाणे गर्दीच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तेथेही पर्यटकांचा हिरमोड होऊ लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com