Premium|Afzal Khan Pratapgad Visit : आदिलशाहीचा ‘शिवरायांचा पूर्ण विनाश’ हुकूम, अफजलखानाची क्रूर मोहीम आणि सह्याद्रीत उभा ठाकलेला प्रतापगडाचा संग्राम

Maratha War Tactics : विजापूरहून 'जिंदा या मुर्दा'चा विडा उचलून निघालेल्या क्रूर अफजलखानाला शिवरायांनी आपल्या विलक्षण मुत्सद्देगिरीने जावळीच्या घनदाट जंगलात खेचून आणले असून, प्रतापगडाच्या पायथ्याशी होणाऱ्या या ऐतिहासिक आणि थरारक भेटीची ही युद्धनीतीपूर्ण पार्श्वभूमी आहे.
Afzal Khan Pratapgad Visit

Afzal Khan Pratapgad Visit

esakal

Updated on

अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक

अफजलखान शिवरायांना मारण्याच्या हेतूने मोठ्या फौजेनिशी विजापूरहून निघाला. तो वाईला आल्यावर, शिवरायांनी मुत्सद्देगिरीने त्याला जावळीत प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास राजी केले. खानाने सर्व बाजूंनी वेढा दिला, तरीही शिवरायांनी संयम बाळगला. खानाची क्रूरता आणि शिवरायांची युद्धनीती यातून प्रतापगडावरील आगामी थरारक भेटीची पार्श्वभूमी स्पष्ट होते.

आदिलशाहाचा हेतू ः मोहिमेवर निघतेसमयी अली आदिलशाहाने अफजलखानास पुढील आदेश दिला, ‘त्यास (शिवाजीराजांस) मुळापासून उखडून काढून, त्याच्या आयुष्याची शिल्लक रक्कम विनाशाच्या मुशीत वितळवावी व त्याच्या आयुष्याचे शेत घोड्यांच्या टापांखाली तुडवावे... त्याच्या आयुष्याच्या पिकावर मृत्यूचा अग्नी फेकण्याशिवाय आणि त्याच्या जीविताची गढी पाडण्याशिवाय दुसरे काहीही करू नये...’ (तारीख-इ अली). याचा अर्थ, ‘जिंदा या मुर्दा’ नव्हे तर शिवरायांना मारण्याचा स्पष्ट हुकूम खानाला होता. अफजलखानाच्या या मोहिमेचे शिवचरित्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, याचे कारण त्याचे व्यक्तिमत्त्व.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com