Premium|Chh. Shivaji Maharaj History : शिवाजी महाराजांची खानदेश-वऱ्हाड-बिदर मोहीम; मुघल प्रांतात चौथाई करार, लूट आणि किल्ल्यांवरील विजयी स्वाऱ्या

Shivaji Maharaj’s Khandesh Campaign : १६७०मध्ये कुंजरगडावरून कूच केल्यानंतर शिवाजीराजांनी बागलाण, खानदेश आणि वऱ्हाडातील मुघल प्रदेशावर चौफेर हल्ले केले. बहादूरपूरवरील अचानक हल्ल्याने मुघल छावणीत दहशत निर्माण झाली.
Chh. Shivaji Maharaj Khandesh Campaign

Chh. Shivaji Maharaj Khandesh Campaign

esakal

Updated on: 

कुंजरगड येथून १५ नोव्हेंबर १६७०च्या सुमारास राजांनी कूच केले व मुघल प्रांतावर चौफेर हल्ले चढविले. बागलाणातील महत्त्वपूर्ण किल्ले जिंकल्यानंतर खानदेश, वऱ्हाड व बिदर प्रांताकडे त्यांनी आपले लक्ष वळविले. नंदूरबार व अन्य शहरांच्या मुघली अधिकाऱ्यांकडून चौथाई देण्याचे लेखी करार करून घेतले. ज्यामुळे मुघलांच्या सार्वभौम सत्तेला व प्रतिष्ठेला मोठा तडा गेला.

खानदेशावर स्वारी

खानदेश प्रांताचे महत्त्व ः तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला हा मैदानी प्रांत अत्यंत सुपीक व व्यापारी दृष्टीने संपन्न होता. या प्रांताच्या उत्तरेस सातपुडा व दक्षिणेस अजिंठा डोंगररांग येते. आजच्या उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरचा परिसर या प्रांतात मोडत असे. ‘बुऱ्हाणपूर’ ही या प्रांताची राजधानी होती. याशिवाय दख्खनचा प्रवेशद्वार समजला जाणारा असीरगड तसेच चोपडा, धरणगाव, रावेर ही या प्रांतातील प्रमुख स्थाने होती. बागलाणातील काही किल्ले जिंकल्यानंतर राजांनी खानदेश व वऱ्हाडाकडे आपला मोर्चा वळविला.

बुऱ्हाणपूरचे उपनगर बहादूरपूरची लूट ः बागलाणातून वऱ्हाडाकडे जात असताना राजांनी एक सैन्यतुकडी तापी नदीच्या तीरावरील बुऱ्हाणपूरकडे धाडली. या सैन्याने २० नोव्हेंबर १६७०च्या सुमारास बुऱ्हाणपूरच्या अलिकडे सुमारे ५ कि.मी.वर असलेल्या बहादूरपूर येथे अनपेक्षितपणे हल्ला केला. शत्रू गोटात दहशत व गोंधळ निर्माण करण्याचा उद्देश सफल झाल्यानंतर, शक्य तेवढी लूट घेऊन ते माघारी फिरले. इकडे बुऱ्हाणपूर या आपल्या जहागिरीची जबाबदारी आपला मुलगा हमीदखान याच्याकडे सोपवून, दाऊदखान

बागलाणात धुमाकूळ घालणाऱ्या शिवसैन्यास थोपवून धरण्यासाठी वणवण भटकत, अखेरीस अणकाई-टणकाई जवळ थांबला होता. तेवढ्यात शिवसैन्य बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्यासाठी येत असल्याचा निरोप त्याच्या मुलाने त्याला दिला. हे ऐकून दाऊद बिथरला व तो तडक ईशान्येस सुमारे २२३ कि.मी. अंतरावरील बुऱ्हाणपूरच्या दिशेने वेगाने निघाला. अणकाई-टणकाई पासून ईशान्येस सुमारे ६५ कि.मी. अंतरावरील चाळीसगाव येथे कसाबसा पोहोचल्यानंतर त्याला हेरांकडून निरोप मिळाला की, ‘मराठे बुऱ्हाणपूरपर्यंत पोहोचलेच नाहीत, मात्र त्यांनी बहादूरपुर लुटले आणि ते माघारी फिरले आहेत.’ हा निरोप मिळूनही तो बुऱ्हाणपूरच्या दिशेने प्रवास करीतच राहिला. फर्दापूर घाटातून त्याने अजिंठा डोंगररांग ओलांडली, तेव्हा तिथे त्याला पुन्हा निराशाजनक बातमी मिळाली की, ‘मराठ्यांनी पुन्हा बागलाणात येऊन मुल्हेरची पेठ लुटली आहे व साल्हेरला वेढा दिला आहे.’ मराठ्यांच्या या अखंड प्रवासामुळे दाऊदचे सैन्य पार थकून गेले होते. बाजारबुणगे व खाद्यसामग्री मागे ठेऊन, अखंड मजल मारत दाऊद वेगाने साल्हेरच्या बचावासाठी निघाला.

Chh. Shivaji Maharaj Khandesh Campaign
Latest Updates Marathi: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com