

Siddharth Jadhav Struggle
esakal
आशिष पाथरे - sakal.avtaran@gmail.com
सिद्धार्थ महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाला. अख्ख्या शिवडी एरियात वट वाढली. तिकडे गेल्यावर लोकांच्या डोळ्यांत जुन्या ‘अग्निपथ’मधल्या टिनू आनंदसारखी भावना दिसायला लागली... ‘मेरा विज्जूबेटा आ गया’... पण सिद्धार्थमधला जाळ शांत झाला नव्हता...
झगमगत्या यशामागे संघर्षाची कहाणी असते. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ताऱ्यांनी स्वप्नाला जिद्दीची जोड देत अथक मेहनतीच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांची प्रेरणादायी संघर्षकथा मांडणार आहेत, लेखक-दिग्दर्शक आशिष पाथरे. त्यांचे हे पाक्षिक सदर तुम्हाला जमिनीवर राहून आकाशात तळपणाऱ्या ताऱ्यांची गोष्ट सांगणार आहे. त्यातील पहिला तारा आहे, अभिनेता सिद्धार्थ जाधव...
मुंबईतल्या शिवडीच्या झोपडपट्टीत स्वप्नंसुद्धा दाटीवाटीने राहतात. ‘सिद्धार्थ जाधव’ त्यातलं एक स्वप्नं जगला. त्या स्वप्नाला झोपडपट्टीतून मोठ्या जागेत घेऊन आला आणि मोठ्या अवकाशातसुद्धा...