
32 Sham Marriages in 9 Months in Singapore : सिंगापूरमधील सरकारी यंत्रणा सध्या वेगळ्याच विषयामुळे चिंतीत आहेत. सिंगापूरमधील पुरुष आणि परदेशी महिला यांच्यामध्ये सध्या 'खोटे लग्न किंवा सोयीचे विवाह' यांचा ट्रेंड वाढत चालला आहे. म्हणजे काय, तर सिंगापूरमधील पुरुषाशी लग्न झाल्याचे दाखवायचे आणि तेथील नागरिकत्व मिळवायचे. त्यासाठी त्या पुरुषाला चांगली रक्कम दिली जाते. या अशा प्रकारामुळे इमिग्रेशन अँड चेकपॉईंट्स अथॉरिटी (ICA) ची डोकेदुखी वाढवली आहे. यामागे मोठा रॅकेट असल्याचा संशय असून या प्रवृत्तीमुळे देशातील सामाजिक समस्या उद्भवू शकतात, असा इशारा दिला जात आहे.