

Smart Meter vs Old Meter: What Changes for Electricity Consumers?
E sakal
Mahavitaran Smart Meter Row Explained: Consumer Concerns, Billing and Government Stand
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढते का? ग्राहकांना न विचारता जुने मीटर बदलले जाणार का? आणि आता फक्त ४८ तासांची मुदत देण्यात आलीय का? महावितरणच्या एका संदेशामुळे हे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्यभर स्मार्ट मीटरविरोधी वातावरण असतानाच या संदेशाने नव्या वादाला तोंड फुटले. नेमका वाद काय आहे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद काय आहेत, ते जाणून घेऊया.
सरकार काय म्हणते?
याआधीसुद्धा स्मार्ट प्रीपेड मीटरचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावेळी सरकारने सांगितलं होतं की ग्राहकांवर या मीटरची सक्ती केली जाणार नाही. जुलै २०२५मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की, राज्यातील कोणत्याच ग्राहकावर स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येणार नाही. विधानपरिषदेतील प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्रजी म्हणाले की, स्मार्ट मीटर लावल्याने उलट वीजबिल कमी आलं आहे. राज्यात ३७ लाख स्मार्ट मीटर लावलेले आहेत आणि त्यातील केवळ १ टक्के ग्राहकांनीच तक्रारी केल्या आहेत. उरलेल्या ९९ टक्क्यांनी नाही.
त्यावेळी देवेंद्रजींनी असंही सांगितलं होतं की, ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर आहेत त्यांना एक अधिकची सूट मिळेल. सौरउर्जेच्या वापराचे काही तास ठरलेले आहेत. त्याकाळात तुम्ही वीजेचा वापर केला तर बिलामध्ये १० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
याआधी इतकी खुली भूमिका घेणाऱ्या सरकारने आता मात्र भूमिका बदलली असल्याचा आरोप होतोय.