

Online Engagement Tricks
Esakal
Rage bait: सोशल मीडियावर स्क्रोलिंग करता करता खूप वैताग येतो, चिडचिड होते असं होतं ना कधीकधी, तुमच्या फीडमध्येच खरंतर अशा गोष्टी येतात की ज्या पाहून रागच यावा पण तो राग तुमच्या अधिक स्क्रोलिंगमध्ये कन्व्हर्ट होतो आणि तुम्ही स्क्रीनवर खिळवलेले डोळे बाजूला काढतंच नाही.
यालाच म्हणतात रेज बेट. रेज म्हणजे राग आणि बेट म्हणजे माशाचा गळ किंवा प्रलोभन. राग येण्यातून अधिकाधिक रील्स पाहिली जाणं, अर्थात रागाचं प्रलोभन दाखवून युजर्सना स्क्रीन पाहण्यास भाग पाडणं.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २०२५चा शब्द म्हणून याच 'Rage bait'ची निवड केलीय. काय आहे विषय समजून घेऊया...