
Ladakh protests Sonam Wangchuk
esakal
सुनील चावके
बलप्रयोगाने न सुटणाऱ्या समस्यांसाठी चर्चा, संवाद आणि वाटाघाटीचे शांततामय पर्याय उपयुक्त ठरू शकतात काय, याचा विचार करायला हवा. याबाबतीत सरकारला आत्मपरीक्षण करावे लागेल. लडाखमधील घडामोडींमुळे ही गरज प्रकर्षाने जाणवत आहे.
दे श सध्या अनेक ज्वलंत प्रश्नांशी झुंजत असताना त्यात पूर्ण राज्य आणि सहावी अनुसूची लागू करण्याची मागणी करणाऱ्या लडाखच्या आंदोलनाची भर पडली आहे. पोलीस गोळीबारात चार जण ठार आणि ७० जण जखमी झाल्याने नेपाळच्या झेन झी आंदोलनाचे प्रतिबिंब शांतताप्रिय लडाखच्या हिंसक आंदोलनात उमटल्याची चर्चा सुरू झाली.