

Specialised Investment Funds
esakal
‘सेबी’ने एक एप्रिल २०२५ पासून एसआयएफ (Specialised Investment Funds) हे विशेष गुंतवणूक फंड आणले आहेत. ते म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) यांच्यातील अंतर भरून काढतात. यात किमान दहा लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते, जी सर्वसामान्य म्युच्युअल फंडापेक्षा जास्त; पण ‘पीएमएस’च्या ५० लाखांपेक्षा कमी आहे. हे फंड गुंतवणूकदारांना लाँग-शॉर्ट, डेरिव्हेटिव्ह आणि मिश्र धोरणांद्वारे उच्च परतावा देण्याचे आश्वासन देतात; पण जोखीमही जास्त असते.
भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने एक एप्रिल २०२५ पासून एसआयएफ (Specialised Investment Funds) हे विशेष गुंतवणूक फंड आणले आहेत. ‘एसआयएफ’ या विशेष गुंतवणूक फंडाची धोरणे अतिशय वैविध्यपूर्ण आणि प्रगत असतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना उच्च परताव्याची अधिक शक्यता असते. शेअर, रोखे, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी), डेरिव्हेटिव्हज आणि कमोडिटी यांच्या मिश्रणावर गुंतवणूक धोरणे आधारित असतात.