
Startup India Seed Fund Scheme
esakal
तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी... 'स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना'
तुमच्या मनात एक जबरदस्त बिझनेस आयडिया आहे, पण त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी पैसे नाहीत? निधीची कमतरता जाणवते?
भारतात दररोज हजारो तरुण उद्योजक नवनवीन कल्पना घेऊन येतात, पण योग्य आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे अनेक स्वप्नं पूर्ण होऊ शकत नाहीत.
यावर उपाय म्हणून भारत सरकारने 'स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना' सुरू केली आहे. ही योजना केवळ आर्थिक मदतच नाही, तर तुमच्या बिझनेसच्या सुरुवातीच्या प्रवासात एक मजबूत आधार बनू शकते. चला तर मग, या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया 'सकाळ प्लस'च्या या लेखात...
स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना ही केंद्र सरकारने २०२१ मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याचा मुख्य उद्देश, सुरुवातीच्या टप्प्यातल्या स्टार्टअप्सना त्यांच्या प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, प्रोटोटाइप बनवण्यासाठी, उत्पादनाच्या चाचण्या घेण्यासाठी, बाजारात प्रवेश करण्यासाठी आणि व्यावसायीकरण करण्यासाठी आर्थिक मदत करणं आहे.
ही मदत थेट सरकारकडून दिली जात नाही, तर देशभरातल्या पात्र इनक्यूबेटर्सच्या माध्यमातून स्टार्टअप्सना दिली जाते. यामुळे, स्टार्टअप्सना फक्त निधीच नाही, तर अनुभवी मार्गदर्शकांचं मार्गदर्शनही मिळतं, जे त्यांच्या वाढीसाठी खूप महत्वाचं ठरतं