Premium|Stock Market Correction : शेअर बाजार घसरतोय म्हणून गुंतवणूक काढून घ्यावी का?

Stock Market Correction and Long Term Investment : भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती आणि संभ्रम वाढला आहे. मात्र, हर्षद मेहता गैरव्यवहार, आयटी बबल, सबप्राइम संकट आणि कोविडनंतरही बाजार सावरला. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी कोणत्या चुका टाळाव्यात आणि संयम कसा राखावा, याचा आढावा.
Stock Market Correction and Long Term Investment

Stock Market Correction and Long Term Investment

esakal

Updated on: 

सुहास राजदेरकर - suhas.rajderkar@gmail.com

सध्याच्या काळात शेअर बाजारातील घसरण पाहून गुंतवणूकदारांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, बाजारातील प्रत्येक घसरण कायमस्वरूपी नुकसान करणारी नसते. इतिहास सांगतो, की अनेक मोठ्या संकटांनंतरही बाजार सावरला आहे. मग सध्याच्या पडझडीकडे कसे पाहावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि गुंतवणुकीचा संयम कसा टिकवावा? याबाबत मार्गदर्शन करण्याचा हा प्रयत्न...

भारतीय शेअर बाजारांनी मागील दोन वर्षांत शून्य परतावा दिला. असे प्रथमच घडत आहे का? मागील ४० वर्षांत असे अनेक वेळा घडले आहे, की बाजाराने अनेक महिने नकारात्मक परतावा दिला. परंतु, बाजार पुन्हा सावरला आणि वर गेला. हर्षद मेहता गैरव्यवहार प्रकरण, आयटी बबल, अमेरिकेतील सबप्राइम संकट, कोविड महासाथ अशी अनेक कारणे आहेत, ज्यांमुळे बाजार खाली गेला आणि पुन्हा वरही आला. (सोबतच्या तक्त्यात कोणत्या कारणांमुळे बाजार किती खाली गेला आणि किती वेळात सावरला, याची आकडेवारी दिली आहे.) शेअर बाजाराने दरवर्षी बँक एफडीपेक्षा दुप्पट परतावा दिलाच पाहिजे, असे नाही. आजही ‘सेन्सेक्स’ ७५,००० अंशांच्या आसपास असताना, ४७ वर्षांत (१९७९ = १००) बाजाराने सरासरी १५ टक्के परतावा दिला आहेच!

Loading content, please wait...