Premium|Strait of Hormuz : होर्मुझ सामुद्रधुनी: जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेचा केंद्रबिंदू

Maritime Security : जागतिक व्यापाराच्या धमन्या असलेल्या सामुद्रधुनी सध्या भू-राजकीय संघर्षाची केंद्रे बनली आहेत. ऊर्जा पुरवठा, नौदल शक्ती आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी होर्मुझ, मलाक्का आणि बाब-अल-मंदेब यांसारख्या अरुंद जलमार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण ठरत आहे.
Strait of Hormuz

Strait of Hormuz

esakal

Updated on

डॉ. श्रीकांत कार्लेकर

सामुद्रधुनी ही बहुतेकवेळा अत्यंत ताणतणावाच्या क्षेत्राचे किंवा उच्च संघर्षाचे क्षेत्र असते. मलाक्काच्या सामुद्रधुनीतील चाचेगिरी किंवा ‘बाब-अल-मंदेब’मधील प्रादेशिक, अनियमितपणे चालणारी युद्धे ही सामुद्रधुनींच्या याच वैशिष्ट्याची उदाहरणेे आहेत.

पृ थ्वीवरील महासागरांच्या सीमावर्ती भागांत तयार होणाऱ्या लहान-लहान प्रदेशांना समुद्र), आखात), सामुद्रधुनी, उपसागर अशा संज्ञांनी ओळखले जाते. हे सगळे सीमावर्ती सागरी प्रदेश २६ लाख ते सात कोटी वर्षांपूर्वी भूमिखंडांच्या तुटण्यामुळे तयार झाले. यातील प्रामुख्याने सामुद्रधुनींचे भौगोलिक स्थान जागतिक भूराजनीतीचा पायाभूत घटक म्हणून काम करते. दोन मोठ्या जलाशयांना (उदा. समुद्र किंवा महासागर) जोडणाऱ्या नैसर्गिक आणि अरुंद जलमार्गाला ‘सामुद्रधुनी’ म्हटले जाते. यातून जहाजांची वाहतूक सहजपणे होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com