
How Sufiya Sufi became an ultra runner राजस्थानच्या अजमेर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली सुफिया सुफी... आकाशात विमानं उडताना पाहून तिनेही भरारी घेण्याचं स्वप्न बघितलं. वडील शिक्षक असल्याने त्यांनीही आपल्या मुलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलं होतं. पण, सुफिया १६ वर्षांची असताना वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपलं अन् जणू स्वप्नांच्या पंखांमधील ऊर्जा कमी झाली. आईने प्रचंड कष्ट घेत चार मुलांना आपल्या पायावर उभं केलं. सुफियाने डॉक्टर व्हावे ही वडिलांची इच्छा होती, परंतु तिला Aviation इंडस्ट्री खुणावत होती. आकाशात उडणारं विमान तिच्या अजूनही डोळ्यासमोर होतंच आणि ती अजमेर सोडून दिल्लीत स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली. आईने कर्ज घेऊन तिला शिकवलं. बाहेरून जग जसं चकचकीत दिसतं, तसं ते नसतं...