Premium|Pharma Growth Strategy : सुप्रिया लाइफसायन्सची दमदार आर्थिक कामगिरी, निर्यात आणि नफ्यात मोठी झेप

Supriya Lifescience Results : सुप्रिया लाइफसायन्सने महसूल, निर्यात आणि नफ्यात उल्लेखनीय वाढ नोंदवत जागतिक बाजारपेठेतील उपस्थिती अधिक मजबूत केली. उत्पादन क्षमता विस्तार आणि कार्यक्षमतेमुळे कंपनीची आर्थिक कामगिरी अधिक भक्कम झाली.
Pharma Growth Strategy

Pharma Growth Strategy

esakal

Updated on

डॉ. सलोनी वाघ

भारतीय औषधनिर्माण उद्योगात जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘सुप्रिया लाइफसायन्स’ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने महसूल आणि नफ्यात उल्लेखनीय वाढ साधली आहे. आगामी काळातील कंपनीच्या विस्तार योजना, धोरणे याबाबत कंपनीच्या कार्यकारी संचालक डॉ. सलोनी वाघ यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी ‘सकाळ मनी’साठी घेतलेली ही खास मुलाखत...

प्रश्‍न : सुप्रिया लाइफसायन्स कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६चे निकाल जाहीर केले. कंपनीच्या प्रभावी निकालामागील आणि निव्वळ नफ्यातील वाढीमागे प्रमुख घटक कोणते?

डॉ. सलोनी : आमची आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील कामगिरी ही सर्व उत्पादन विभागांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. सुधारित भौगोलिक विस्तार आणि अधिक मजबूत ‘ऑपरेशनल लिव्हरेज’चा हा परिणाम आहे. या वर्षात महसुलात मोठी वाढ झाली असून, करपश्चात नफ्यातही उल्लेखनीय वाढ झाली आहे. ही वाढ केवळ एका घटकामुळे नव्हे, तर ‘प्रॉडक्ट मिक्स’मधील सुधारणा, वाढीव निर्यात आणि उत्पादन मालमत्तेचा अधिक कार्यक्षम वापर या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे झाली आहे. सर्वाधिक वाढ अ‍ॅनेस्थेटिक विभागात झाली असून, हा विभाग वाढीचा प्रमुख चालक ठरला. या विभागाचा वाढता वाटा आमच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील टिकून असलेल्या मागणीचे आणि निवडक बाजारपेठांमधील सखोल विस्ताराचे प्रतीक आहे. व्हिटॅमिन्स विभागातही सुधारित गती दिसून आली असून, त्याचे योगदान वाढले आहे, ज्यामुळे आमच्या उत्पादन पोर्टफोलिओच्या विविधतेला बळ मिळाले आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहता, लॅटिन अमेरिकेने सर्वाधिक वाढ नोंदवली असून, एकूण विक्रीतील तिचा वाटा वाढला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत उत्तर अमेरिकेतील वाटाही वाढला आहे, जो नियंत्रित बाजारपेठांमधील आमची वाढती उपस्थिती दर्शवतो. युरोप ही आमची पारंपरिकदृष्ट्या सर्वांत मोठी बाजारपेठ राहिली असून, या बाजारपेठेत आम्ही अतिरिक्त बाजारहिस्सा मिळवला आहे. त्यानंतर साधारण ३२ टक्के वाट्यासह आशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. आमच्या एकूण महसुलापैकी सुमारे ८४ टक्के महसूल निर्यातीतून येतो. त्यातील मोठा भाग नियंत्रित भौगोलिक प्रदेशांतून येत असल्याने, जागतिक बाजारपेठेतील आमची उपस्थिती महसुलात स्थैर्य आणि किंमत नियंत्रण या दोन्ही बाबींमध्ये सातत्याने मदत करत आहे. नफा टिकवून ठेवण्यात ऑपरेशनल कार्यक्षमतेने महत्त्वाची भूमिका बजावली. लोटे येथील प्रकल्पात मॉड्यूल ‘ई’ कार्यान्वित झाल्यामुळे आर्थिक वर्ष २०२५च्या तुलनेत क्षमता वापरात सुधारणा झाली आहे. ३३५ किलो क्षमतेच्या वाढीमुळे उत्पादनवाढ शक्य झाली असून, स्थिर खर्चाचे अधिक प्रभावी विभाजन करणे शक्य झाले. जवळपास ८० टक्के महसुलामध्ये केलेल्या ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’मुळे नफाक्षमता वाढली. परिणामी, कर आणि घसारापूर्व नफा वाढला असून, तो आमच्या ३३ ते ३५ टक्के या दीर्घकालीन मार्गदर्शक मर्यादेतच राहिला आहे. एकंदरीत, या वर्षातील वाढ ही केवळ अल्पकालीन व्हॉल्यूम-आधारित विस्तारावर आधारित नसून, उत्पादनांचे वाढते योगदान, विस्तारणारी निर्यात बाजारपेठ आणि शिस्तबद्ध धोरणात्मक पायाभूत वाढ यांवर आधारलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com