Premium|Theory of Constraints : ‘थिअरी ऑफ कन्स्ट्रेन्ट्स’ नेमकं काय सांगते?

Tenali Value Framework : तेनाली रामनच्या मिश्कील संवादातून व्यवसायातील अडथळे ओळखण्याची ‘थिअरी ऑफ कन्स्ट्रेन्ट्स’ समजून घेऊया; व्यवस्थेतील मुख्य अडथळा दूर केल्यास व्यवसायाची कार्यक्षमता आणि वाढ कशी साधता येते, जाणून घ्या.
Theory of Constraints

Theory of Constraints

esakal

Updated on

प्रतीक डुंबरे-capsdumbre@gmail.com

मध्ययुगीन इतिहासातील एक बुद्धिमान, मिस्कील आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व म्हणजे तेनाली रामन! आजच्या एकविसाव्या शतकात एका काल्पनिक साम्राज्यातील हा तेनाली आपल्या महाराजांशी संवाद साधत व्यवसायातील काही महत्त्वाची रहस्ये उलगडतो, ‘तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क’च्या माध्यमातून ‘थिअरी ऑफ कन्स्ट्रेन्ट्स’ (टीओसी-TOC) जाणून घेऊ या.

एकदा साम्राज्यातील बाजारपेठांची पाहणी करण्यासाठी महाराज आणि तेनाली सकाळीच बाहेर पडले होते. कुठे धान्य बाजार, कुठे लोखंडी साहित्याची दुकाने, तर कुठे कपड्यांची गजबज. दुपारच्या सुमारास ते एका शाळेजवळील बाजारपेठेत आले. शाळा सुटण्याची वेळ असल्यामुळे संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांची लगबग होती. समोरच एक स्टेशनरीचे दुकान दिसले. बाहेर वह्या, पाण्याच्या बाटल्या, रंगीत चार्ट, प्रोजेक्ट साहित्य, फाइल, पेन, पेन्सिली आणि शाळेच्या बॅग अशा अनेक वस्तूंनी दुकान भरून गेले होते.

महाराज आनंदाने म्हणाले, ‘‘तेनाली, हे दुकान तर खूपच भरभराटीत दिसते आहे. एवढी गर्दी म्हणजे चांगली कमाई असणार.’’

तेनाली हसत म्हणाला, ‘‘महाराज, गर्दी दिसते आहे खरी; पण व्यवसायाची ताकद गर्दीत नसते. ती व्यवस्थेत असते. चला, आत जाऊन पाहू.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com