Premium|Medical Entrance Exam Malpractices India : ‘नॅशनल टेस्टिंग’ की ‘नो ट्रस्ट’ एजन्सी? ‘नीट’ पेपरफुटीमुळे एनटीएने पुन्हा ओढवून घेतली नामुष्की

NEET 2026 Paper Leak Controversy : ‘नीट’ परीक्षेतील ६०० गुणांच्या पेपरफुटीमुळे ‘एनटीए’च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रचंड नामुष्की ओढवली आहे. देशपातळीवरील हा अभूतपूर्व गोंधळ रोखण्यासाठी आता ‘एक देश, एक परीक्षा’ या अट्टहासावर फेरविचार करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.
NEET 2026 Paper Leak Controversy

NEET 2026 Paper Leak Controversy

esakal

Updated on

हरीश बुटले - saptrang@esakal.com

‘नीट’ ही परीक्षा पेपरफुटीमुळे गाजत आहे. ही परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’ नावाच्या संस्थेचे नामकरण ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या ऐवजी ‘नो ट्रस्ट एजन्सी’ असं करावं की काय इतकी नामुष्की या संस्थेने आतापर्यंत ओढवून घेतलेली आहे. खरेतर देशपातळीवरील या परीक्षेचे स्तोम कमी होऊन या परीक्षांमध्ये कोणत्याही पातळीवर जरी काही अनुचित प्रकार घडले, तरी उर्वरित परीक्षांच्या माध्यमातून त्याची भरपाई करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हायला हवी आणि त्यांचे होणारे संभाव्य नुकसान थांबायला हवे. मात्र त्यासाठी ''एक देश एक परीक्षा'' हा अट्टहास सोडावा लागेल.

‘नीट’च्या (NEET) परीक्षेत २०२४ पाठोपाठ एक वर्षाच्या अंतराने २०२६ मध्ये पुन्हा एकदा अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला. या वेळी कोणतेही आढेवेढे न घेता आणि वेळ न दवडता ‘एनटीए’ने परीक्षा रद्द केली. कारणच तसं सबळ होतं! तब्बल ७२० पैकी ६०० गुणांचा पेपर फुटलेला होता. या वेळीची परिस्थिती तशी थोडी वेगळ्या पद्धतीची होती. गेस पेपरच्या नावाखाली मूळ प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली गेली. संपूर्ण देश पातळीवर विविध ठिकाणावर २५ लाखांपासून तर थेट ३० हजार रुपयांत विक्री झाली. क्लासेस मधून थेट विद्यार्थ्यांना सराव परीक्षेच्या स्वरूपात प्रश्न वितरित करण्यात आले आणि हद्द म्हणजे परीक्षा झाल्यानंतर त्यातील किती अचूक आलेलं होतं, ते विद्यार्थ्यांकडूनच वदवून घेणारे विद्वान क्लास चालक. सर्वच कल्पनेच्या पलीकडे! आता हा संपूर्ण तपास हा सीबीआय कडे सोपविला गेलेला आहे. त्यामुळे यातील संपूर्ण तथ्य बाहेर येईल याची आशा करू या. यात जे कोणी दोषी सापडतील, त्यांना अतिशय कडक अशी शिक्षा होणे, परीक्षा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com