

Global Climate Finance 2030
esakal
हवामान होरपळीविरुद्ध मानवाच्या झुंजीबाबत कृतिआराखडा पुढे नेण्यासाठीची जागतिक परिषद नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ब्राझीलमधील बेलेम शहरात पार पडली. परंतु त्यातील पवित्रे फारसे समाधानकारक नव्हते. राष्ट्रीय हितसंबंधांपेक्षा मानवी कल्याण महत्त्वाचे हे प्रदूषक राष्ट्रांच्या इतक्या वर्षांनंतरही गळी उतरत नाही, ही खेदाची बाब.
हवामान होरपळीविरुद्ध मानवाच्या झुंजीबाबत कृतिआराखडा पुढे नेण्यासाठीची जागतिक परिषद नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ब्राझीलमधील बेलेम शहरात पार पडली. अशा परिषदांमध्ये खरोखर निर्णायक अशा फार थोड्या गोष्टी होतात. पण जर त्याही होत नसत्या तर आजवर झाली तेवढीही कृती झाली नसती, हे लक्षात घेऊनच त्यांचा ऊहापोह करावा लागतो. युरोपीय समुदायातील देश; तसेच अन्य १९३ देशांच्या मिळून एकूण ५६ हजार ११८ लोकांनी तिथे हजेरी लावली.