

Indian Women Cricket World Cup 2025
esakal
लेखक - वैभव खुपसे
भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला विश्वचषक जिंकल्याचा क्षण हा फक्त क्रीडा विजय नव्हता तो प्रत्येक गावात, शहरात आणि घराघरात घुमलेला अभिमानाचा क्षण होता. ‘मुली हे करू शकत नाहीत’ असे ज्यांना कधी सांगितले गेले, त्या प्रत्येक मुलीला या विजयानं सांगितलं की तू नक्कीच करू शकतेस असा विश्वास निर्माण झाला आहे.
या चॅम्पियन्सची कथा अंतिम सामन्याच्या दिवशी सुरू झालेली नव्हती. ती सुरू झाली होती धुळीच्या मैदानांत, अरुंद गल्ल्यांत, छोट्या घरांत आणि गर्दीच्या कोचिंग कॅम्पमध्ये. ती सुरू झाली होती त्या मुलींपासून ज्या टेनिस चेंडूने, तुटक्याफुटक्या बॅटने आणि न थांबणाऱ्या जिद्दीने क्रिकेट खेळत होत्या. काहींना चिडवले गेले, काहींना थांबवले गेले, काहींना समाजानेच निरुत्साही केले पण त्यांच्यात एक गोष्ट समान होती, ती म्हणजे त्यांची जिंकण्यासाठीची स्वप्न..! संघर्षांच्या पायावर उभा ठाकलेला विजय