Premium|Raj Bhavan vs Nabanna Conflict : राजभवन-नबन्ना संघर्ष; पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा वादळ

West Bengal Constitutional Crisis : पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून, आर. एन. रवी यांच्या नियुक्तीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र-राज्य संबंधांतील घटनात्मक पेच आणि राजकीय ध्रुवीकरण अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Raj Bhavan vs Nabanna Conflict

Raj Bhavan vs Nabanna Conflict

esakal

Updated on

सुरेंद्र पाटसकर - sarkarnama@esakal.com

पश्‍चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्ष नवीन नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संघर्षाने भाजपबरोबरील संघर्षाला अधिक धार आली आहे. आपले हेतू साध्य करण्यासाठी केंद्र सरकार राज्यपालांचा वापर करत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी वारंवार केला आहे. इतर मुद्द्यांबरोबरच हा संघर्षाचा मुद्दा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गाजणार हे नक्की.

भारतीय संघराज्य व्यवस्थेची रचना अशी आहे की राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोन पदांमध्ये समन्वय असणे अपेक्षित असते. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात, तर मुख्यमंत्री हे लोकनियुक्त सरकारचे नेतृत्व करतात. या दोन पदांमध्ये संतुलन राखले गेले तर प्रशासन सुरळीत चालते; परंतु या नात्यात जेव्हा राजकारण घुसते, तेव्हा संघर्ष अपरिहार्य ठरतो. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडी ही या वास्तवाची जिवंत उदाहरणे आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष आता अपवाद राहिलेला नाही; तो जणू राज्याच्या राजकारणाचा कायमस्वरूपी भाग बनला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com