

Power and Energy Index
esakal
प्रमोद पुराणिक - pramodpuranik५@gmail.com
देशाच्या आर्थिक विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ऊर्जा क्षेत्राकडे सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेगाने वेधले जात आहे. जागतिक घडामोडी, विशेषतः भू-राजकीय तणाव आणि ऊर्जा सुरक्षेचे वाढते महत्त्व, यामुळे पॉवर आणि एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर ३६ कंपन्यांचा समावेश असलेला ‘पॉवर अँड एनर्जी’ निर्देशांक केवळ बाजारातील हालचाली दर्शवत नाही, तर गुंतवणुकीच्या संधी आणि जोखमींचाही वेध घेण्यास मदत करतो.
वर अँड एनर्जी’ या निर्देशांकाची सुरुवात ३१ डिसेंबर २०१३ रोजी झाली. या निर्देशांकात एकूण ३६ कंपन्या आहेत. सुरुवातीच्या दिवशी या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य १००० असे गृहीत धरून हा निर्देशांक सुरू करण्यात आला. या निर्देशांकात जून आणि डिसेंबर या महिन्यांत, म्हणजे सहामाही फेरबदल केला जातो. बीएसई ५०० या निर्देशांकातील कंपन्यांच्या यादीतून या ३६ कंपन्यांची निवड केली जाते.
हा निर्देशांक दोन एप्रिल २०२६ रोजी ३७५० या स्तरावर बंद झाला. त्या दिवशी या ३६ कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४९,१६,२१३ कोटी रुपये होते, तर बाजारातील उपलब्ध (फ्री फ्लोट) मूल्यांकन २०,२५,८६१ कोटी रुपये होते.
या निर्देशांकाचे पी/ई (Price to Earnings) गुणोत्तर १३.६५ होते. याचा अर्थ असा, की सुमारे १,४८,४१५ कोटी रुपयांच्या अपेक्षित निव्वळ नफ्यासाठी बाजार ४९,१६,२१३ कोटी रुपये मोजण्यास तयार आहे. दुसऱ्या शब्दांत, एक रुपया नफ्यासाठी १३.६५ रुपये देण्याची गुंतवणूकदारांची तयारी आहे. यावरून अपेक्षित उत्पन्न दर सुमारे ७.३३ टक्के ठरतो.