Premium|Nepal : जेन झी पिढीच्या नेतृत्वाखाली नेपाळचे नवे युग सुरू होतंय का..?

Generation Z : जर हिंसा किंवा अराजकतेकडे वळली तर नैराश्य आणि अपयश नक्की आहे...
Role of Gen Z in Nepal's political and social transformation

Role of Gen Z in Nepal's political and social transformation

Esakal

Updated on

तिलक जंग खाडका

तरुणांची ऊर्जा रचनात्मकरीत्या वापरली जाते, तेव्हा खरे रूपांतर घडू शकते; पण ती जर हिंसा किंवा अराजकतेकडे वळली तर नैराश्य आणि अपयश नक्की आहे. नेपाळमधील आंदोलनाने हेच दाखवून दिले. म्हणूनच आता एक देश म्हणून नेपाळला पुन्हा उभे राहायचे असेल तर ‘जेन झी’चा आवाज गांभीर्याने ऐकणे आवश्यक आहे. नेपाळमधील राजकीय पक्ष, समाज आणि माध्यमांनी मान्य करायला हवे, की आजची तरुणाई केवळ आंदोलनकर्ती नाही; तर ती देशाच्या भविष्याची मूळ शिल्पकार आहे.

२१व्या शतकातील डिजिटल युगात वाढलेली जनरेशन झी अर्थात ‘जेन झी’ची पिढी जगभरात एक सशक्त सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय शक्ती म्हणून उदयास आली आहे. नेपाळ त्याला अपवाद नाही. ‘जेन झी’ पिढीतील तरुण नोकऱ्यांमध्ये अधिकाधिक दिसू लागले आहेत. आपल्या प्रगतीसाठी नवनवीन उद्योजकतेचे मार्ग ते शोधत आहेत. सोबतच ते सामाजिक-राजकीय जीवनावरही आपला प्रभाव टाकू लागले आहेत.

‘जेन झी’च्या आवडीनिवडी जुन्या पिढ्यांपेक्षा वेगळ्या आहेत... नेपाळमध्येही नुकतेच त्याचे उदाहरण पाहायला मिळाले. नेपाळच्या सामाजिक जीवनात दीर्घकाळापासून वर्चस्व गाजवणाऱ्या पारंपरिक व्यवस्थांना आजचे तरुण आव्हान देत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांनी त्यांचा आवाज अधिक बुलंद केला आहे. व्यवस्थेविरोधात खदखदणारा असंतोष व्यक्त करण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना जबाबदार ठरवण्यासाठी आणि त्याविरोधात सामूहिक कृती करण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com