Premium|US Iran Conflict Global Economic Crisis 2026 : इराण-अमेरिका संघर्षाने जागतिक अर्थकारण कोलमडले; आखाती देशांसह भारताला महागाईचा मोठा हादरा!

Economic Crisis in Qatar UAE and Saudi Arabia : २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधनपुरवठा विस्कळित झाला असून, आखाती देशांसह भारताला सहन कराव्या लागणाऱ्या महागाई आणि आर्थिक मंदीच्या तीव्र झळांचे केलेले सविस्तर विश्लेषण.
US Iran Conflict Global Economic Crisis 2026

US Iran Conflict Global Economic Crisis 2026

esakal

Updated on

डॉ. अमिताभ सिंग - samitabh@gmail.com

इराण-अमेरिका संघर्षाने केवळ मध्यपूर्वेतील राजकारणच ढवळून निघालेले नाही; तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हादरा बसला आहे. तेलपुरवठा, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीवर झालेल्या परिणामांमुळे आखाती देशांसह भारतालाही महागाई, आर्थिक मंदी आणि राजनैतिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. युद्धामुळे जागतिक अर्थकारणात प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे.

इराण-अमेरिका युद्ध समाप्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे; परंतु अजूनही अंतिम तोडगा निघालेला नाही. या युद्धामुळे संपूर्ण जग महागाईच्या वणव्याखाली भरडले गेले आहे. २८ फेब्रुवारीला सुरू झालेले हे युद्ध विशेषतः मध्यपूर्वेतील अनेक तेलसमृद्ध देशांसाठी आर्थिक संकट घेऊन आले आहे. कतार, ओमान, सौदी अरेबिया, बहारीन, यूएई आणि कुवेत या आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांचे अर्थकारण या युद्धाने बिघडवून टाकले आहे. त्यामुळे जागतिक इंधनपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. त्याच्या झळा आता भारतासह जगाला सहन कराव्या लागत आहेत. या युद्धामुळे मध्यपूर्वेतील तेलाधारित अर्थव्यवस्थेतील कच्चे दुवेही समोर आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com