

External Intelligence India
esakal
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षाव्यवस्थेत बाह्य गुप्तचर संस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या संदर्भात Research and Analysis Wing (RAW) ही भारताची प्रमुख बाह्य गुप्तचर संस्था मानली जाते. १९६२ मधील चीनविरुद्धच्या युद्धानंतर आणि १९६५ मधील पाकिस्तानविरुद्धच्या युद्धानंतर स्वतंत्र बाह्य गुप्तचर यंत्रणेची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यानुसार १९६८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात ‘रॉ’ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला सुमारे २५० अधिकाऱ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज बहुआयामी, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि जागतिक स्तरावर कार्यरत आहे.