

E-Shram Portal Benefits 2026
esakal
डॉ. कुलदीपसिंह राजपूत - (स्थलांतर, कामगार व सामाजिक धोरण अभ्यासक)
स्थलांतरित आणि असंघटित कामगारांसाठी पाच किलो ‘एलपीजी’ सिलिंडरची पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे नुकतीच केलेली घोषणा स्वागतार्ह असली, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी हीच खरी कसोटी ठरणार आहे.
देशात सहा वर्षांपूर्वी मार्च महिन्यात जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे स्थलांतरित असंघटित कामगारांना अक्षरशः शेकडो किलोमीटर पायी चालत गावी परतावे लागले होते. गावी परतणाऱ्या या कामगारांची दृश्ये आजही सार्वजनिक स्मरणात कोरलेली आहेत. कोविडमुळे त्या वेळी उद्योग ठप्प झाले, रोजगार अचानक नाहीसा झाला आणि शहरातील कामगारांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परतीचा मार्ग पत्करावा लागला. आज या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे. देशातील विविध शहरांमध्ये स्थलांतरित कामगार पुन्हा गावाकडे, घराकडे परतत आहेत; मात्र यावेळी परतीच्या स्थलांतरामागील कारण बेरोजगारी नाही, तर ‘एलपीजी’च्या वाढत्या किमती आणि तुटवड्यामुळे शहरांमध्ये स्थलांतरित कामगारांची अन्न असुरक्षा तीव्र झाली आहे; परिणामी किमान जगणेसुद्धा कामगारांना परवडेनासे झाले आहे. कामगार परतून लागल्याने उद्योग क्षेत्र अडचणीत येत आहे.