Premium|Antarctica Climate Change : थ्वाइट्स हिमनदी: पृथ्वीच्या किनाऱ्यांचा भूगोल बदलणारी प्रलयकारी प्रक्रिया

Impact of Thwaites Glacier melting on global sea levels : जगाच्या विनाशाचा संकेत? अंटार्क्टिकातील विशाल 'थ्वाइट्स' हिमनदी झपाट्याने वितळत असून, ती कोसळल्यास जागतिक समुद्रपातळी अर्धा मीटरने वाढू शकते. 'डूम्सडे ग्लेशियर' म्हणून ओळखली जाणारी ही बर्फाची भिंत मुंबईसह अनेक किनारपट्टीच्या शहरांसाठी अस्तित्वाचे संकट ठरू शकते.
Impact of Thwaites Glacier melting on global sea levels

Impact of Thwaites Glacier melting on global sea levels

esakal

Updated on

पूर्व अंटार्क्टिकातील जाड, स्थिर बर्फपत्रापेक्षा पश्चिम भाग अधिक अस्थिर आहे, कारण त्यातील मोठा भूभाग समुद्रसपाटीखाली आहे. थ्वाइट्स हिमनदी जणू या खंडाच्या कडेला लटकलेली एक प्रचंड बर्फभिंत आहे, जी संथपणे समुद्रात ढकलली जात आहे.

अंटार्क्टिका खंडातील हिमनद्या, त्यांचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, तेथील हिमनद्या या का जीवनदायिनी आहेत, याचा आढावा मागच्या लेखामध्ये घेतला. त्यावेळी एका विशेष हिमनदीवरही चर्चा केली, जी प्रलयकारी होऊ शकते. ती विशाल आहे, विस्तीर्ण आहे, म्हणूनच तिच्याकडे संपूर्ण जग धास्तावलेल्या नजरेने पाहत आहे. शांत, निळसर-पांढऱ्या बर्फाच्या अनंत विस्तारात ती जणू एखाद्या संथ; पण अटळ प्रवासावर निघालेली शक्ती आहे; आवाज न करता पुढे सरकणारी, पण आपल्या मार्गात महासागरांचे भविष्य घेऊन चाललेली. या हिमनदीचे नाव आहे थ्वाइट्स हिमनदी आणि वैज्ञानिक जगात ती ‘डूम्सडे ग्लेशियर’ म्हणून ओळखली जाते. हे नाव भीती निर्माण करण्यासाठी दिलेले नाही, तर गेल्या काही दशकांत झालेल्या संशोधनातून स्पष्ट झालेल्या वास्तवामुळे रूढ झाले आहे. समुद्रसपाटीखालील उतारावर विसावलेली ही हिमनदी उबदार समुद्री पाण्यामुळे तळापासून वितळत आहे, तिचा पुढील बर्फपट्टा तडे जाऊन कमकुवत होत आहे आणि ती कोसळली तर केवळ स्वतःच नव्हे तर तिच्या मागे अडकलेला प्रचंड पश्चिम अंटार्क्टिक बर्फसाठाही समुद्रात झेपावू शकतो. यामुळे जगभरातील समुद्रपातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे ‘डूम्सडे’ हा शब्द तत्काळ प्रलयाचा संकेत नसून, भविष्यात पृथ्वीच्या किनाऱ्यांचा भूगोल बदलू शकणाऱ्या एका शांत; पण गंभीर प्रक्रियेची जाणीव करून देणारा आहे.

Impact of Thwaites Glacier melting on global sea levels
Premium|Climate Change: गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा नेमका काय..?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com