
IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या पहिल्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हजारो चाहते जमले होते. स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली.
या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या विजयोत्सवावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षात आयपीएल फक्त क्रिकेट स्पर्धा राहीली नाही तर हा एक मोठा बिझनेस झाला आहे.