Premium|International Religious Freedom Report : अमेरिकेची वार्षिक आगपाखड!

US India Diplomatic Relations : अमेरिकेच्या 'यूएससीआयआरएफ' संस्थेने प्रसिद्ध केलेला भारतातील धार्मिक स्वातंत्र्याचा अहवाल पूर्वग्रहदूषित असून, स्वतःच्या देशातील हिंदूंवर होणाऱ्या हिंसक हल्ल्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अमेरिकेचा हा दुटप्पीपणा आणि जागतिक न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न अत्यंत हास्यास्पद आणि आक्षेपार्ह आहे.
US India Diplomatic Relations

US India Diplomatic Relations

esakal

Updated on

विनय सहस्रबुद्धे - माजी खासदार

भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या विषयावर अमेरिकेतील ‘युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनेशनल रिलिजियस फ्रीडम’ म्हणजेच ‘यूएससीआयआरएफ’ या संस्थेचा भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबद्दलचा अहवाल सालाबादप्रमाणे याही वर्षी जाहीर झाला आहे. सालाबादाप्रमाणेच त्यातील आशय भारतातील धर्मस्वातंत्र्याच्या कथित संकोचाबद्दल चिंता व्यक्त करणारा आहे. मुदलात ही संस्था आहे तरी काय आणि इतर देशातील धर्मस्वातंत्र्याची चिंता करण्याचे काम तिला दिले तरी कोणी? ती जे अहवाल दरवर्षी प्रकाशित करते त्याबाबत भारत सरकार आणि अन्य देशातील सरकारे नेमकी काय भूमिका घेतात? हे अहवाल किती वस्तुनिष्ठ मानले जातात? शिवाय इतर देशातील धार्मिक स्वातंत्र्याच्या कथित हानीचे कुसळ पाहणाऱ्या अमेरिकेला त्यांच्या देशातील मुसळ नजरेस येते की नाही? त्यासंदर्भात ते नेमके काय करतात, हे आणि असे अनेक प्रश्न यासंदर्भात निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरे शोधतांना कोणाही अभ्यासकाला जाणवतो तो अमेरिकेचा तद्दन शहाजोगपणा आणि त्यातून आपण वैश्विक समुदायाच्या हिताचे एकमेव रक्षणकर्ते आहोत, हे ठसविण्याचा तिचा प्रयत्न.

तसेच बघायचे तर ज्या संस्थेच्या अहवालातील शिफारशी अमेरिकी सरकारला (सुद्धा) बंधनकारक नाहीत त्या अहवालाला इतरांनी फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. पण भारतात सेक्युलरिझम धोक्यात असल्याचे ज्या लोकांना वाटते त्यांना असे अहवाल सुखावून जातात. त्याचे हे सुख अमेरिकेच्या शहाजोगपणाला असलेल्या रणनीतिक पायाबद्दलच्या अज्ञानातून निर्माण झालेले आहे आणि म्हणूनच ही अज्ञानमूलक समजूत किती पोकळ आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com