

Spiritual Experience in Mangeshi
esakal
हृदयनाथ मंगेशकर - saptrang@esakal.com
पंडितजी गंभीरपणे म्हणाले.
‘‘मुला, तुझी शंका विचार करायला लावणारी
आहे. रान किंवा वन हे लहान
असते, सुंदर असते. पण अरण्यासारखे
रौद्र्यरूप दाखवणारे नसते. त्यामुळे
रानभुलीपेक्षा निसर्गभूल ही अधिक
प्रत्येयकारी असेल, पण...’’
आणि अचानक घुघु ऽऽऽ घू ऽऽऽ घू ऽऽऽ
असा भयानक आवाज करीत एक घुबड
आमच्या डोक्यावरून उडत गेले.
आणि
कधी वज्र धरेवर गगनातुन कडकडते
कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,
प्रमदेचे मादक वस्र जणू सळसळते,
अशी लवलवत, सळसळत एक तेजाची
शलाका ‘विद्युलता’ या ध्रुवावरून त्या
ध्रुवावर जाऊन आदळली.
अनेक सूर्यांनी एकाच वेळी प्रकाशावे, तसा
आसमंत जाळून टाकणारा प्रकाश पडला.
‘‘बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट
ओघ बारा वाटा मुरूडताती’’
घोंघावत बारा वाटा मुरडून टाकणारा,
पाण्याचा श्रोत आकाशगंगेचा बांधारा,
फोडून आमच्यावर कोसळू लागला.
क्षणभर आश्चर्यचकित झालेले पंडितजी,
क्षणभरच दिसले आणि दुसऱ्याच क्षणी
शेकोटी विझली. आणि ती चक्क पाण्याच्या
ओघात वाहूनच गेली.
मी आणि पंडितजी अंधकाराच्या
खोल खोल गर्देत फेकले गेलो.
‘‘घाबरलास का?’’
पंडितजीनी शांतपणे विचारले.
‘‘बिलकुल नाही.’’
मी ही तितक्याच शांत आवाजात उत्तरलो.
‘‘का?’’