मीनाक्षी काटकर हडसन पुरीवाढप३ ते ४ व्यक्तींसाठीसाहित्यदोन वाट्या कणीक, १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी चणा डाळीचे पीठ, २ टोमॅटो, २ कांदे, २ चमचे हिरवी मिरची व लसूण पेस्ट, १ चमचा धने-जिरे पूड, हळद, मीठ, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, २ वाटी हडसनची पाने, तळण्यासाठी तेल. .कृतीसर्वप्रथम सर्व पिठे परातीत घ्यावीत. टोमॅटो व कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. हे वाटण व इतर सर्व जिन्नस पिठात घालून घट्ट गोळा भिजवावा व लहान लहान पुऱ्या लाटाव्यात. नंतर गरम तेलात खरपूस तळाव्यात. गरमागरम हडसन पुऱ्या लोणच्याबरोबर खायला द्याव्यात..मिश्र डाळींचे फुंडकेवाढप२ व्यक्तींसाठीसाहित्यप्रत्येकी अर्धी वाटी तूर डाळ-मूग डाळ-मटकी डाळ-चणा डाळ-मसूर डाळ, १ वाटी चिरलेला कांदा, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा तेल, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, जिरे, मोहरी, १ वाटी चिरलेली कोथिंबीर.कृतीसर्व डाळी रात्रभर पाण्यात भिजत ठेवाव्यात. सकाळी त्या स्वच्छ धुऊन निथळत ठेवाव्यात. नंतर मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून पेस्ट तयार करावी. त्यात मीठ आणि हळद घालून मिश्रण नीट एकत्र करावे. नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत आणि त्यांना वाफवून घ्यावेत. नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लसूण आणि चिरलेला कांदा परतून घ्यावा व त्यात वाफवलेले गोळे (फुंडके) घालून नीट परतावे. शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम मिश्र डाळींचे फुंडके सर्व्ह करावेत..ग्रीन समुद्रशोक वडीवाढप५ ते ६ व्यक्तींसाठीसाहित्यएकपाव चिरलेली समुद्रशोकाची पाने, एकपाव चणा डाळीचे पीठ, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, कढीलिंब, हळद.फोडणीसाठी : एका मिरचीची पेस्ट, कांदा, धने-जिरे पूड, मोहरी, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, ५ ते ६ चिरलेल्या हिरव्या मिरच्या.कृतीसर्वप्रथम चिरलेली पाने, चणा डाळीचे पीठ, मिरची-लसूण पेस्ट, हळद आणि मीठ एकत्र करून घट्ट गोळा तयार करावा. हा गोळा कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी होईपर्यंत वाफवावा. थंड झाल्यावर त्याच्या मध्यम आकाराच्या वड्या कराव्यात. नंतर वर दिलेले साहित्य वापरून चविष्ट फोडणी तयार करावी आणि त्या वड्यांवर घालावी..बीटरूट मिठीवाढप३ ते ४ व्यक्तींसाठीसाहित्यदोन वाट्या कणीक, १ वाटी रवा, १ वाटी किसलेला गूळ, २ वाट्या बिटाचा कीस, वेलची पूड, तळण्यासाठी तूप.कृतीकणीक, रवा, बिटाचा कीस, गूळ आणि वेलची पूड हे सर्व साहित्य एकत्र मिसळावे आणि त्याचा एकसंध, घट्ट गोळा तयार करावा. नंतर लहान लहान पुऱ्या लाटून त्या गरम तुपात तळून घ्याव्यात.टीप : बिटाचा कीस एकदम न घालता थोडाथोडा घालावा. मिश्रणात बसत नसेल तर बाजूला शिल्लक ठेवावा..समुद्रशोकाची सुकी भाजीसाहित्यसात ते आठ समुद्रशोकाची पाने, १ मोठा चिरलेला कांदा, ५ ते ६ चिरलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने-जिरे पूड, हळद, मीठ, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ मोठा चमचा तेल, मोहरी, जिरे.कृतीसर्वप्रथम पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घालून फोडणी करावी. त्यात लसूण आणि कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतावे. तिखट, हळद, मीठ आणि चिरलेली पाने घालून खमंग परतावे. आता थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी. शेवटी कोथिंबीर घालून नीट कालवावी. गरमागरम भाजी भाकरीसोबत वाढावी.टीप : समुद्रशोकाच्या पानाला दुमड मारून मधली शीर कापून घ्यावी. भाजी चिरायला सोपी जाईल व कचकच लागणार नाही..मँगो मिठीवाढप३ ते ४ व्यक्तींसाठीसाहित्यदोन वाट्या कणीक, १ वाटी रवा, १ वाटी किसलेला गूळ, २ लहान वाट्या पिकलेल्या आंब्याचा गर, वेलची पूड, तळण्यासाठी तूप.कृतीसर्वप्रथम कणीक, रवा, गूळ, आंबा गर आणि वेलची पूड हे सर्व घटक एकत्र करून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यावा. नंतर लहान लहान पुऱ्या लाटाव्यात आणि त्या तुपात खरपूस तळून घ्याव्यात. गरमागरम मँगो मिठी तयार!.ड्रमस्टिक पुरीवाढप३ ते ४ व्यक्तींसाठीसाहित्यदोन वाट्या कणीक, १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी चणा डाळीचे पीठ, २ टोमॅटो, २ कांदे, दोन चमचे हिरवी मिरची व लसूण पेस्ट, १ चमचा धने-जिरे पूड, हळद, मीठ, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, २ वाट्या शेवग्याची पाने, तळण्यासाठी तेल.कृतीसर्वप्रथम सर्व पिठे परातीत एकत्र करून घ्यावीत. टोमॅटो आणि कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा. हे वाटण व इतर सर्व जिन्नस पिठात मिसळून घट्ट गोळा भिजवावा. नंतर लहान लहान पुऱ्या लाटून त्या गरम तेलात तळाव्यात. तयार झालेल्या गरमागरम ड्रमस्टिक पुऱ्या चिंचेच्या गोडसर चटणीसोबत सर्व्ह कराव्यात..मल्टी पल्सेस चटणीवाढप५ ते ६ व्यक्तींसाठीसाहित्यपाव वाटी चणा डाळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी मसूर डाळ, १ वाटी दही, ५ ते ६ लसूण पाकळ्या, जिरे, मोहरी, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ कढीलिंब पाने, तेल.कृतीसर्व डाळी ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर सर्व डाळी मिक्सरमध्ये थोड्या जाडसर वाटून घ्याव्यात व रवीने घुसळलेले दही त्यात मिसळावे. नंतर कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, जिरे, मोहरी आणि कढीलिंब घालून फोडणी करावी. ही फोडणी डाळीच्या मिश्रणात ओतावी. त्यात चवीनुसार मीठ घालून नीट एकत्र करावे. झटपट आणि चविष्ट मल्टी पल्सेस चटणी सर्व्ह करावी!.Premium|Mango Recipe: आंब्याचे दहीवडे..? हो..भाजी, पापड, चाट आणि पराठासुद्धा.. कसे बनवायचे पाहुया...करवंद चटणीसाहित्यअडीचशे ग्रॅम करवंदे, ५ ते ६ लाल मिरच्या, १ चमचा भाजलेले जिरे, १०० ग्रॅम गूळ, काळे मीठ चवीपुरते, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, ५ ते ६ लसूण पाकळ्या.कृतीसर्वप्रथम करवंदे स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. थोड्याशा तेलात मिरच्या हलक्या भाजून घ्याव्यात. नंतर करवंदे, भाजलेल्या मिरच्या आणि इतर सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. तयार आहे चविष्ट, गोडसर-आंबट करवंद चटणी!.Premium|India’s Strategic Push for Mango Exports: भारत हा जगातला सर्वात मोठा आंबा उत्पादक देश; भविष्यात आंबा निर्यातीला चालना देणे शक्य..? .कैरीचे लोणचेसाहित्यएक किलो कैरी, १ वाटी मीठ, अर्धी वाटी साखर, पाव वाटी बडीशेप पूड, १ चमचा मेथी, एकपाव तेल, १०० ग्रॅम मोहरीची डाळ, १ पाकीट लोणचे मसाला, ८ ते १० लसूण पाकळ्या.कृतीकैऱ्या काही वेळ पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर पुसून, त्यांच्या फोडी करून कोय काढून टाकावी आणि फोडी स्वच्छ पुसून घ्याव्यात. फोडींमध्ये मीठ आणि साखर घालून दोन दिवस झाकून ठेवावे, त्यामुळे छान रस सुटतो. नंतर मोहरीची डाळ आणि मेथ्या थोड्याशा तेलात हलक्या भाजून घ्याव्यात. वेगळ्या भांड्यात तेल गरम करावे आणि त्यात लसूण पाकळ्या घालून लालसर होईपर्यंत परतावे. गॅस बंद करून मिश्रण कोमट होईपर्यंत थांबावे. नंतर कोमट तेलात वरील सर्व जिन्नस मिसळावेत. हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावर कैरीच्या फोडींमध्ये नीट कालवून घ्यावे आणि नंतर बरणीत भरून ठेवावे.(मीनाक्षी काटकर यवतमाळस्थित फूड ब्लॉगर आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.