
‘मोर्चा’ हा जसा संघटनेच्या प्रगल्भतेचा सामूहिक आविष्कार असतो, तशा ‘संघटनेच्या घोषणा’ या कार्यकर्त्यांच्या मानसिक ताकदीच्या, त्यांच्या लढण्याच्या तयारीच्या प्रमाणक असतात. सर्वात पहिली घोषणा होती, ‘आदिवासी ढोर नाय, मानूस हाय’... म्हणजे आदिवासी तो ‘माणूस’ आहे, ही ओळख विसरला होता. त्याच्या ‘माणूस’ असण्याची त्याला ओळख झाली आहे, याची ही घोषणा प्रमाणक होती... आमची संघटना आता वेठबिगारांच्या मुक्तीकरिता रस्त्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या पायरीपाशी पोहोचली होती...