share market
Esakal
अर्थविशेष । भूषण महाजन
ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनंतरच्या नाट्यातून एकच धडा घेता येतो, ट्रम्प ह्यांनी कुठलीही घोषणा केली तरी त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता थोडे थांबून फाइन प्रिंट बघावी आणि नंतरच निर्णय व धोरण ठरवावे. आज जरी व्हिसाच्या घोषणेतील बराचसा डंख कमी झाला असला, तरी येणाऱ्या काळात काय होऊ शकते ह्याची ही नांदी आहे.
पु. ल. देशपांडे ह्यांनी भाषांतरित केलेले एक झुंज वाऱ्याशी हे नाटक एका सामान्य माणसाच्या एका मोठ्या शक्तीशी असलेल्या संघर्षाची कथा सांगते. नाटकाचेच मेटॅफोर सद्यपरिस्थितीत भारत-अमेरिका संबंधांना, द्वीपक्षीय चर्चेला लागू पडते. एक जागतिक महासत्ता आपल्या इशाऱ्यावर सर्व जगाला कसे नाचवू शकते, हे आपण पाहतोच आहोत. बहुतांशी देशांनी तो इशारा स्वीकारला असला, तरी आपण त्याला यथाशक्ती विरोध करीत आहोत, सर्व बाजूंनी आपली गळचेपी होत असतानादेखील. खरेतर ह्या सप्ताहात ट्रम्प ह्यांचा विषय घेण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण टॅरिफ बॉम्बच्या मागोमाग हा व्हिसा बॉम्ब आल्यामुळे त्याचा परामर्श घेणे सयुक्तिक ठरते.