The effect of US trade policy on Indian industries: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टनंतर भारतावर २५ टक्के टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त, रशियाकडून कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंड लावण्याची धमकीही त्यांनी दिली आहे, पण त्याबद्दल अजून स्पष्टता नाही. ७ ऑगस्टपासून हे नवीन आयात शुल्क लागू होईल. तोपर्यंत, सध्याचे १० टक्के आयात शुल्क चालू राहील.
मुळात हे आयात शुल्क म्हणजे काय..? अमेरिकेने हे किती देशांवर लादले आहे.? या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होईल.? कोणत्या क्षेत्रातील उद्योगांवर याचा परिणाम होईल? याबाबत भारताची भूमिका काय व भारतातील तज्ज्ञांचे याविषयीचे मत काय आहे. हे सगळं जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून..