

UAE Exits OPEC
esakal
तेलाच्या राजकारणात गेल्या काही दशकांत अनेक मोठे बदल झाले, पण ओपेकसारख्या संघटनेचा प्रभाव कोणी हलवू शकलं नाही. तेलाचे दर, जागतिक अर्थव्यवस्था, युद्धं, राजकारण आणि देशांचे संबंध या सगळ्या गोष्टींना हदरवून टाकण्याची ताकद या संघटनेमध्ये आहे. पण आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईने अचानक ओपेक आणि ओपेक प्लसमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. हा फक्त तेल उत्पादनाचा किंवा कोट्याचा वाद नाही, तर त्यामागे मोठं आर्थिक आणि भू-राजकीय गणित दडलं आहे.
यूएईकडे सध्या दररोज सुमारे ४.८ दशलक्ष बॅरल तेल उत्पादन करण्याची क्षमता आहे आणि २०२७ पर्यंत ती ५ दशलक्ष बॅरलपर्यंत नेण्याचा त्यांचा विचार आहे. पण ओपेकने दिलेला उत्पादन कोटा फक्त ३.४ दशलक्ष बॅरल होता. म्हणजेच उत्पादन वाढवायचं असेल तर ओपेकच्या नियमांमध्ये अडकून चालणार नाही हे यूएईला चांगलच समजलं होतं. पण यूएईने हा निर्णय आताच का घेतला हे अनेकांना समजत नाही. कारण होर्मुझ सामुद्रधुनीत जो तणाव सुरू आहे त्यामुळे आता जरी यूएईला जास्त तेल उत्पादन करण्याची संधी मिळाली तरी सुध्दा आता ते तेल बाहेर पाठवूच शकत नाहीत.
मग प्रश्न निर्माण होतो की या निर्णयामुळे ओपेकचं भवितव्य धोक्यात येणार का? यूएईला खरंच अधिक पैसा कमवायचा आहे की त्यामागे आणखी मोठी रणनीती आहे? आणि या सगळ्यात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांची भूमिका काय आहे? या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेवू सकाळ+च्या या लेखातून.