

Union Budget 2026 impact on Indian stock market
esakal
भूषण महाजन- kreatwealth@gmail.com
एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत मांडला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) विक्रीमुळे आधीच अर्धमेल्या झालेल्या शेअर बाजाराने मंदीवाल्यांपुढे पूर्ण लोटांगण घातले. कोणतेही क्षेत्र या मंदीच्या फेऱ्यातून सुटले नाही. इतके वाईट या अर्थसंकल्पात होते तरी काय, याचा ऊहापोह.
खरे तर नव्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तज्ज्ञ त्याची कितीही स्तुती करोत, शेअर बाजार वर गेला की खाली गेला, यातच गुंतवणूकदारांना व पंटर्सना रस असतो. नेमकी ‘निफ्टी’ने ४९५ अंशांनी, तर ‘सेन्सेक्स’ने १५४६ अंशांनी गटांगळी खाल्ली. त्याबरोबर स्मॉल व मिड कॅप शेअर तर अनुक्रमे ४५८ व २८० अंशांनी खाली आले. अर्थसंकल्पाबद्दलच्या अनभिज्ञतेने, अवाजवी अपेक्षा ठेवल्यावर वेगळे काय होणार?