India Needs 8% Growth To Become Developed Nation By 2047
- नीरज हातेकर, अर्थशास्त्राचे प्राध्यापक
India need 8 percent GDP growth by 2047 : कें द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, हा एक उच्चांक मानला जातो. तो रविवारी सादर करण्यात आला आणि या सुटीच्या दिवशी भांडवली बाजारही सुरू ठेवण्यात आला, हाही एक विक्रमच म्हटला पाहिजे. खुली जागतिक अर्थव्यवस्था आता वेगाने नष्ट होते आहे. १९९१ ते २००८ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था खुल्या बाजारपेठांच्या तत्त्वावर आधारित होती. परंतु २००८ च्या वित्तीय संकटानंतर जागतिक अर्थव्यवस्थेतील खुलेपणा कमी झाला. औद्योगिक धोरणात वाढीव आयातकर आणि अनुदान ही आयुधे अधिक प्रमाणात वापरली जाऊ लागली. ह्या दोन्ही धोरणात्मक बाबी खुल्या आर्थिक धोरणाला वर्ज्य. पण आता बहुतेक राष्ट्रे आत्मनिर्भर होण्यावर भर देत आहेत. देशांतर्गत उद्योगांना स्पर्धेपासून कसे वाचविता येईल, हे पाहू लागले. राष्ट्रीय सुरक्षा, आपल्या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविणे, वातावरण बदलाला तोंड देणे, ह्याबरोबर पुरवठासाखळ्या मजबूत करणे आणि भौगोलिक- राजकीय स्थितीमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्याला तोंड देण्याची व्यवस्था करणे हे आता आर्थिक धोरणाचे महत्त्वाचे पैलू आहेत.